रमेश जारकीहोळी यांना खातेवाटपात त्यांच्या मनाजोगे जलसंपदा खाते मिळाले आहे. मात्र अद्याप बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळणार की नाही हे नंतर स्पष्ट होणार आहे.आपल्याला जलसंपदा खाते मिळावे म्हणून ते पहिल्यापासून आग्रही होते.अखेर त्यांनी हट्ट धरल्याप्रमाणे जलसंपदा खाते त्यांनी मिळवले आहे.श्रीमंत पाटील यांना वस्त्रोद्योग व साखर खाते मिळाले आहे.श्रीमंत पाटील हे साखर कारखानदारीत असल्यामुळे त्यांना साखर खात्याचे मंत्रीपद मिळाले आहे.
खातेवाटपात रमेश जारकीहोळी यांना त्यांनी मागीतलेलं जलसंपदा खाते देण्यात आले वजनदार खाते मिळाल्यामुळे जिल्ह्यात सरकार कुणाचेही असो जारकीहोळी कुटुंबाचे वर्चस्व हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
पोट निवडणुकी नंतर रमेश जारकीहोळी यांना मंत्री मिळणार अशी अपेक्षा होती त्यानुसार त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारात शपथ घेतली होती त्यांनी जलसंपदा खात्याची मागणी केली होती पक्ष श्रेष्ठीनी त्याना हें जलसंपदा खाते मिळाले असून बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पद देखील मिळण्याची शक्यता आहे
जगदीश शेट्टर यांच्या कडे बेळगाव जिल्ह्याचे प्रभारी मंत्री पद होते आता ते जारकीहोळी यांना मिळणार आहे.मराठा समाज कोट्यातून आणि रमेश जारकीहोळी यांच्या मदतीने कॅबिनेट मंत्री झालेले श्रीमंत पाटील यांना वस्त्रोद्योग आणि साखर खाते मिळाले आहे.