बावीस वर्षात सतीश जारकीहोळी यांनी जे काम केलंय तेवढं काम दोन वर्षात करून दाखवतो असा विश्वास रमेश जारकीहोळी यांनी व्यक्त केला. मंत्री पदाची शपथ घेताच गोकाकला पहिल्यांदा आगमन झाल्यावर जाहीर सभेत बोलत होते.
मला आलेलं राजकीय संकट दुश्मनाला देखील येऊ नये,संजय पाटील यांच्या बाबतीत माझ्या कडून चूक झाली होती भविष्यात ती सुधारून घेऊ,डी के शिवकुमार यांना मी धन्यवाद देतो कारण त्यांनी विरोध केल्यानेच या घडामोडी घडल्या असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की मला मंत्री पद मिळायला भालचंद्र जारकीहोळी आणि महेश कुमटहळळी कारणीभूत आहेत त्यांनी मागणी केल्याने मला हे पद मिळालं आहे कुमटहळळीला मंत्री पद मिळाले नाही म्हणून काही काळ मनात राग होता असेही त्यांनी नमूद केलं
डी के शिवकुमार यांनी मला मोठा नेता केले.मी भाजपचा आमदार होईन असे मला स्वप्नातही वाटले नव्हते .अगोदर माझ्या बरोबर तिसपेक्षा जास्त आमदार होते पण नंतर अठरा राहिले.जनतेचा विश्वास महत्वाचा.जनतेचा माझ्यावर विश्वास आहे म्हणून मला जनतेने निवडून दिले असे रमेश जारकीहोळी म्हणाले.
मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर रमेश जारकीहोळी यांचे प्रथमच गोकाकला हेलिकॉप्टरने आगमन झाले.यावेळी त्यांचे कार्यकर्त्यांनी जल्लोशी स्वागत केले.पाच क्विंटल सफरचंदाचा वापर करून तयार केलेला हार घालून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
गोकाकला आगमन झाल्यावर मिरवणुकीने त्यांनी लक्ष्मी मंदिराकडे प्रयाण केले.तेथे त्यांनी विशेष पूजा केली.मंत्रिपदाची शपथ घेतल्यावर प्रथमच रमेश जारकीहोळी गोकाकला आल्यामुळे कार्यकर्त्यांत उत्साही वातावरण होते.हजारो कार्यकर्ते त्यांच्या सोबत मिरवणुकीत सहभागी झाले होते.उघड्या जीपमधून रमेश जारकीहोळी यांनी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला.कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन रमेश जारकीहोळी हे पुन्हा आज हेलिकॉप्टरने बंगलोरला रवाना होणार आहेत.