पाणी आडवा पाणी जिरवा या योजना सरकारच्या कागदावरच राहिल्या असल्या तरी शेतकऱ्यांनी मात्र नवनवीन प्रयोग करण्यास सुरुवात केली आहे. यामागे ठिबक सिंचन पद्धत अंमलात आणण्यात आली होती, त्याबरोबरीनेच आता रेन हार्वेस्टिंग वॉटर पाईप ही पद्धत शेतकरी अवलंबून लागले आहेत. त्यामुळे कमी पाण्यात अधिक उत्पन्न आणि अधिक उत्पानावर शेतकरी भर देऊन आल्याचे दिसून येत आहे. बेळगाव तालुक्यात सध्या काही प्रमाणात याचा प्रयोग सुरू असला तरी इतर ठिकाणीही याचे प्रयोग सुरू करण्यात येत आहेत.
बेळगाव तालुक्यातील होनगा येथे रेन हार्वेस्टिंग सारख्या पाईप घेऊन शेती व पिकांना पाणी पाजण्याचे काम सध्या सुरू आहे. कमी पाण्यात अधिक क्षेत्र जमीन कशी भिजवायची याबाबतचा हा उत्तम नमुना असला तरी अजूनही शेतकरी ठिबक सिंचन व रेन हार्वेस्टिंग कडे वाढताना दिसत नाही. त्यामुळे हे प्रयोग यशस्वी करण्यासाठी आता शेतकऱ्यांची धडपड करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्याचा विचार करून शेतकऱ्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये ठिबक सिंचनाद्वारे हार्वेस्टिंग सारखे प्रकल्प राबवण्याची गरज निर्माण झाली आहे.
आधुनिक शेती पद्धतीमध्ये सध्या सुरू असलेले ठिबक सिंचन जसे रुजू लागली आहे तसेच आता रेन हार्वेस्टिंग ही रुजू लागली आहे. हार्वेस्टिंग कमी पाण्यात जास्तीत जमीन भिजवू हा उद्देश असतो. या उद्देशाने दरम्यान सर्व पिकांना पोषक वातावरण आणि पडलेली कीड नाहीशी होते व इतर रोग नाहीसे करण्यासाठी हा प्रयोग यशस्वी ठरत आहे. बेळगाव शहर परिसरात काही प्रमाणात हा प्रयोग सुरू असला तरी अजूनही याकडे शेतकऱ्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
तालुक्यातील काकती परिसरात हा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. या प्रयोगादरम्यान विशेष शेतजमीन भिजण्यासाठी काय करता येईल याकडे लक्ष देण्यात आले आहे. काकती बरोबरच कडोली परिसरातील रेन हार्वेस्टिंग हा प्रयोग सदन संभाजी या शेतकरी यांनी राबविला आहे. या दरम्यान त्यांनी याबाबत चांगलीच माहिती दिली आहे. रेन हार्वेस्टिंगच्या माध्यमातून शेतजमिनी अधिक प्रमाणात पिकांना पोषक ठरते. याबरोबरच यासाठी कमी पाण्यात अधिक पीक घेण्याची क्षमता असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी याकडे वळणे गरजेचे असल्याचे मत संभाजी यांनी व्यक्त केली आहे.