बेळगाव तालुक्यातील शेतकरी सध्या वेगवेगळे प्रयोग शेतीमध्ये आणत आहेत. त्यामुळे अनेकांना त्याचा फायदा होत आहे. नुकतीच बेळगाव येथे रेन हार्वेस्टिंग टाईप मुळे शेती भिजवण्याचे आणि पाणी वाचविण्याचे तंत्र अवलंबिण्यात आले होते. आजचा बेळगाव तालुक्यात उत्तर कोरियातील कोबिज बियाणांचा प्रयोग करण्यात आला आहे आणि तो यशस्वीही ठरल्याचे दिसून येत आहे.
बेळगाव तालुक्यातील कडोली परिसरात उत्तर कोरियातील कोबिज बियाण्यांची लागवड करण्यात आली आहे. ही लागवड योग्य प्रमाणात झाली असून त्याचे उत्पन्नही चांगल्या प्रकारे आले आहे. उत्तर किरीयतील शिगरू नामक कंपनीच्या व्यवस्थापकांनी आणि कर्मचाऱ्यांनी या कोबीजची पाहणी केली आहे. कोरियातून आलेले व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांनी याबद्दल प्रशांत व्यक्त करून समाधान व्यक्त केले आहे.
उत्तर कोरियातील शिंगरू या कंपनीने रिंग कोबीज हे बियाणे तयार केले आहे. ही बियाणे बेळगाव तालुक्यातील अनेक शेतकर्यांनी लागवड केली आहे. तालुक्यातील कडोली, अगसगा या भागातील शेतकऱ्यांनी देखील याची लागवड केली आहे. त्यामुळे या जातीच्या बियाणांची पाहणी करण्यासाठी उत्तर कोरिया होऊन संबंधित कंपनीचे व्यवस्थापक व इतर कर्मचारी भेट दिली. चांगले उत्पन्न आल्याने त्यांनी समाधानही व्यक्त केले आहे.
सध्या शेतकरी वेगवेगळे प्रयोग करत असून ते यशस्वी ठरताना दिसत आहेत. बेळगाव तालुक्यातील कडोली भागात कोबिज हे महत्त्वाचे पीक मानले जाते. त्यामुळे बारा महिने या भागातील शेतकरी कोबीच शिकवण्यावरच अधिक भर देतात. सध्या कडोली भागात कोबीज पिकवण्याकडे मोठा प्रवाह सुरू असून या मध्ये वेगवेगळे प्रयोग करून नफा मिळविण्यात शेतकरी गुंतला आहे . यादरम्यान उत्तर कोरियातील बियाणे आणून ती योग्य प्रकारे टाकून त्यांची निगा राखून उत्तम पणे पीक घेण्यात येत आहे. त्यामुळेच उत्तर कोरियातील बियाणे सध्या बेळगाव तालुक्यात झळकत आहेत.