तालुक्यात रात्रीची शाळा चालेल गतवर्षी झालेल्या एसएसएलसी निकालाचा पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी के वी राजेंद्र यांनी जिल्ह्यातील सर्व गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय व्हावी या हेतूने ग्रामपंचायत तसेच इतर जागी त्यांची शिक्षणासाठीची व्यवस्था करावी असा आदेश काढला आहे. त्यामुळे तालुका पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी आता तालुक्यात दहावी आणि बारावी साठी रात्रीची शाळा भरविण्यात सुरुवात केली आहे.
मोजक्या काही दिवसावरच परीक्षा येऊन ठेपल्याने आता तालुक्यातील विद्यार्थ्यांना त्यांनी योग्य मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली आहे. मागील वेळी होनगा येथे त्यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे अभ्यास कसा करावा आणि कशा पद्धतीने करावा या संदर्भात मार्गदर्शन केले होते. त्यानंतर आता तालुक्यातील प्रत्येक गावात त्यांनी भेटीगाठी वाढवून विद्यार्थ्यांना कमी वेळेत अधिक शिक्षण पद्धत कशी चांगली करावी या हेतूने मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या या शिकवणीमुळे विद्यार्थीही भलतीच खूश झाले आहेत. त्यामुळे या तालुक्यात रात्रीची शाळा सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
येत्या महिन्याभरात दहावीच्या परीक्षा सुरुवात होणार आहे. यानंतर बारावीचा परीक्षांनाही सुरुवात होणार आहे. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीला आणि तेथील अधिकाऱ्यांना तसेच सदस्यांना सांगून त्यांच्या सोयीसुविधा पुरविण्याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली आहे. याचबरोबर विद्यार्थ्यांना कमी वेळेत अधिक शिक्षण कसे द्यावे हे सांगितले आहे.
बुधवारी रात्री दहा वाजेपर्यंत नी बेळगुंदी आणि बिजगरणी या गावांना भेटी देऊन येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतरच त्यांनी परतीचा प्रवास केला. त्यांच्या शिकवणीला विद्यार्थी चांगलेच खूष होत असून सर तुम्हीच आम्हाला शिकवण्यासाठी या असे सांगू लागले आहेत. त्यामुळे यापुढेही ते असेच मार्गदर्शन करत राहणार असल्याचे कलदगी हे सांगत आहेत.