ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे भाऊ चन्नराज हट्टीहोळी यांच्या वर भावावर मोदगा गावचे खोटा रहिवाशी दाखला जोडल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.रहिवाशी दाखला देण्यात कायद्याचे उल्लंघन झाले असून मोदगा ग्राम पंचायत सदस्य बाबू काळे यांच्यावर क्रिमिनल केस दाखल करा असा आदेश जिल्हा पंचायतीचे कार्यकारी अधिकाऱ्यानी मोदगा पी डी ओ यांना आदेश बजावला आहे.यामुळे मोठ्या अविर्भावात वागणाऱ्या आमदार बंधुला यामुळे चाप बसण्याची शक्यता आहे.
खानापूर तालुक्यातील हट्टीहोळ गावचे रहिवाशी असलेले चन्नराज हे मोदगा गावातील घर नंबर 442 मध्ये राहतात असे प्रमाणपत्र दिले होते या प्रमाण पत्राचा वापर करत मोदगा कृषी पत्तीन बॅंकेची निवडणूक लढली होती व या संस्थेच्या सदस्यपदी बिन विरोध निवड झाली होती.
महसूल खात्या कडून रहिवाशी दाखले दिले जातात कोणत्याही ग्राम पंचायत सदस्यांना असे प्रमाण पत्र देण्याचा अधिकार नसतो असे असताना ग्राम पंचायत सदस्य बाबू कोळे यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत रहिवाशी सर्टिफिकेट वर सही करत खोटे प्रमाण पत्र काढून दिले होते.याच डुप्लिकेट सर्टिफिकेटचा वापर करत आमदारांच्या बंधूने बेकायदेशीर रित्या सहकार क्षेत्रात प्रवेश मिळवला होता.भारतीय कृषक संघटनेच्या वतीनं कृषी पत्तीनं सहकारी संघाच्या सचिवांनी सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांनी हट्टीहोळी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी जिल्हा पंचायत सी ई ओ व जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी द्वारा केली होती त्याची दखल घेतली गेली आहे.
अधिकाऱ्यांनी तालुका पंचायत व ग्राम पंचायतीच्या अहवालानुसार जिल्हा पंचायत सी इ ओ के व्ही राजेंद्र यांनी तपास करत रहिवाशी दाखला खोटा असल्याचे समोर येताच ग्राम पंचायत सदस्य बाबू कोळे यांच्यावर क्रिमिनल केस दाखल करा अश्या सूचना पी डी ओ यांना दिल्या आहेत.याबाबत प्रादेशिक आयुक्तांना देखील तक्रार करण्यात आली त्यावर आयुक्तांनी डुप्लिकेट सर्टिफिकेट वितरण प्रकरणांची गंभीरपणे दखल घेत मोदगा ग्राम पंचायत सदस्य बाबू कोळे,आमदारांचे बंधू चन्नराज हट्टीहोळी व प्राथमिक कृषी उत्पन्न सहकारी संघाचे सचिव यांच्यावर कायदेशीर कारवाई करा अशी सूचना जिल्हा पंचायत सी ई ओ यांना केली होती .
याबाबत भारतीय कृषक संघटनेचे अध्यक्ष सिद्धगौड मोदगी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ग्राम पंचायत सदस्य बाबू कोळे,आमदारांचे बंधू चन्नराज हट्टीहोळी व प्राथमिक कृषी उत्पन्न सहकारी संघाचे सचिव या तिघांवर तात्काळ क्रिमिनल केस दाखल करावी,सहकारी पथ संस्थेचे पद रद्द करावे अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला आहे.
ही आहे जुनी बातमी