बेळगावचा लढा लोकशाही मार्गातून सुरू असताना काही कन्नड संघटनांची अडाणी टोळकी मराठी व्यवसायिकांच्या वैयक्तिक मालकीच्या व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला आहे हा देखील दोन भाषेत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे अश्यावर कारवाई करा अशी मागणी युवा समितीने केली आहे.
युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके यांच्या नेतृत्वाखाली युवकांनी मंगळवारी सकाळी पोलीस आयुक्त बी एस लोकेशकुमार यांची भेट घेतली यावर तक्रार केली.फलक मोठा बसवण्याच्या नावाखाली पोलिसांच्या संरक्षणात हे काम सुरू आहे पोलीसच व्यावसायिकांना दम देण्याचा प्रयत्न करत अशी तक्रार देखील यावेळी करण्यात आली.
वरील विषयाप्रमाणे बेळगाव मध्ये उद्यमबाग परिसरात दिनांक 2 फेब्रुवारी 2020 रोजी काही कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व्यापारी अस्थापणावरील फलक, रेटबोर्ड, व्हिजिटिंग कार्ड कन्नड मध्ये करावे यासाठी व्यापाऱ्यांच्या वयक्तिक संपत्ती मध्ये घुसून धुडगूस घालण्याचा आणि धमकवण्याचा प्रकार केला आहे. हा पहिलाच प्रकार नसून वेळोवेळी बेळगाव बाहेरून येणाऱ्या संघटनेकडून असे प्रकार होत आहेत. त्यामुळे भूमिपुत्र व्यापारी मानसिक तणावाखाली येत असून अश्या गुंडगिरीमुळे व्यापार सुद्धा थंडावला आहे. आणि या लोकांसोबत पोलीस सुद्धा येत असून पोलीस त्यांना संरक्षण पुरवीत आहेत हे प्रथम दर्शीनी दिसून येत आहे. तेव्हा अश्या प्रकारे बेळगावच्या शांत वातावरणाला गढूळ करण्याचे कार्य अश्या संघटना करीत असून दोन भाषिकामध्ये तेढ निर्माण करण्याचे कार्य करीत आहेत.
कानडी संघटनांच्या या प्रकारामूळे मराठी भाषिक व्यावसायिकात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे याच गोष्टी बेळगावात वातावरण दूषित करण्यासाठी कारणीभूत आहेत यामुळं वातावर बिघडत आहे अश्यावर योग्य कारवाई झाली पाहिजे अशी मागणी झाली.
पोलीस आयुक्त बी एस लोकेश कुमार यांनी या प्रकरणाची देखल घेण्याचे आश्वासन देत योग्य ती कारवाई केली जाईल व्यापाऱ्यांनी निर्भीडपणे व्यवसाय करावा असे आवाहन केलं
यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, उपाध्यक्ष संतोष कृष्णाचे, सरचिटणीस श्रीकांत कदम, किरण धामणेकर, विजय जाधव, नारायण मुचंडीकर, विनायक कावळे, किरण हुद्दार, मनोहर हुंदरे, चंद्रकांत पाटील, किशोर मराठे, विशाल गौडाडकर, सिद्धार्थ चौगुले, महंतेश कोळूचे, आशिष कोचेरी, ओमकार चौगुले, कपिल बिर्जे, दिनेश मोरे, वासू सामजी, सुरज गोरल, नागेश बोभाटे सचिन केळवेकर आदी उपस्थित होते.
या प्रकरणी युवा समितीने उद्यमबाग पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षकांची भेट घेत तक्रार केली आहे.पोलिसच कन्नड भाषिक कार्यकर्त्यांना घेऊन फिरत होते त्यामुळे अश्या घटनांना आवर घाला असे युवा समितीने म्हटलं आहे.