Monday, January 13, 2025

/

मयुरा शिवलकर बनल्या नागपूरच्या पहिल्या ‘टायगर (वु)मॅन’

 belgaum

बेळगावच्या क्रीडापटू मयुरा शिवलकर यांनी नागपूर येथील प्रो हेल्थ फाउंडेशनतर्फे गेल्या रविवारी प्रथमच आयोजित केलेल्या टायगर मॅन ट्रायथलॉन स्पर्धेतील महिला गटाचे जेतेपद हस्तगत केले.

सदर टायगर मॅन स्पर्धेत 3 कि. मी. जलतरण, 120 कि. मी. सायकलिंग आणि 25 कि. मी. धावणे या ऑलिंपिक धर्तीवरील शारीरिक व मानसिक क्षमतेचा कस पाडणाऱ्या क्रीडा प्रकारांचा समावेश होता. यापैकी नागपूरच्या प्रचंड विस्ताराच्या अंबासरी तलावामध्ये तापमान 12 डिग्री सेल्सिअस इतके असताना जलतरण प्रकार घेण्यात आला. त्यापाठोपाठ नागपूर मुंबई हायवेवर 120 कि. मी. सायकलिंग आणि त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गावर 25 कि. मी. धावण्याची शर्यत घेण्यात आली.

नागपूरसह हुबळी, मुंबई, दिल्ली आणि कोल्हापूरच्या स्पर्धकांचा प्रामुख्याने सहभाग असणाऱ्या या स्पर्धेत बेळगावच्या एकमेव स्पर्धक असलेल्या मयुरा शिवलकर यांनी स्पर्धेच्या तीनही क्रीडा प्रकारात 9 तास 24 मिनिटे इतका वेळ देऊन अव्वल स्थान पटकाविले. कडाक्याची थंडी आणि पाऊस पडत असताना मयुरा यांनी ही सर्वोत्तम कामगिरी बजावली हे विशेष होय.

नागपूरचा अनुभव अत्यंत विलक्षण होता गेल्या फेब्रुवारी 2018 मध्ये मी अशाच प्रकारच्या शारीरिक व मानसिक क्षमतेचा कस लावणाऱ्या स्पर्धेत भाग घेतला होता. अशा स्पर्धांमुळे आपण खूप सक्षम आहोत याची जाणीव करून देणारा आत्मविश्वास मला मिळाला. मानसिक क्षमतेचा कस पाडणाऱ्या या स्पर्धांमुळे मी वैयक्तिक आव्हानं आणि भीतीवर मात करू शकले, असे अशी प्रतिक्रिया मयुरा शिवलकर यांनी उपरोक्त यश मिळविल्यानंतर व्यक्त केली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.