माझे मित्र रामभाऊ माझ्या अगोदर गेले पण त्यांचे स्वप्न साकार झाल्याची आज मला दिसत आहे मी पंतप्रधान असताना त्यांनी मला शेतकऱ्यांसाठी एक साखर कारखाना काढायचा आहे हे तो मंजूर करा असे सुचवले आणि काही वर्षांनी कारखान्यासाठी प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाली अनंत अडचणी आल्या आणि कारखाना व्हायचे राहून गेले त्यांचे चिरंजीव व अविनाश पोतदार यांनी कारखान्याची सूत्रे हातात घेतली आणि सर्व अडचणींना तोंड देत हा कारखाना उभा केला या कारखान्यातून बाहेर पडलेल्या साखरेची चवही आज मी पाहिली मला ती आवडली ज्या रामभाऊंनी या कारखान्याच्या उभारणीसाठी आपली हयात घालवली त्यांचे स्मारक येथे उभे केले जावे मी हयात असेन तर नक्की त्यांच्या पुतळ्याला हार घालायला येईल असे भावोत्कट उद्गार भारताचे माजी पंतप्रधान श्री एच डी देवेगौडा यांनी बोलताना व्यक्त केले.
काकती बेळगाव येथे उभारण्यात आलेल्या मार्कंडे सहकारी साखर कारखान्याच्या ट्रायल सीझनच्या गळीत हंगामातील सव्वालाख आव्या पोत्याचे पूजन करण्याचा कार्यक्रम बुधवारी दुपारी कारखाना परिसरात संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून देवेगौडा हे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी हे होते. श्री पांडुरंग आचार्य यांच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली एच डी देवेगौडा आणि उपस्थितांनी केल्यावर सुरेश अंगडी यांनी गणेश पूजन केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला साखर पोत्यांचे पूजन देवेगौडा यांनी केले.
उपस्थितांचे स्वागत करून कारखान्याचे चेअरमन अविनाश पोतदार यांनी कारखान्याच्या उभारणीत सहकार्य केलेल्या अनेकांचा मुक्तकंठाने गौरव केला.कारखाना सुरू करण्यासाठी आलेल्या अडचणीत सांगतानाच नैतिक आधार दिलेल्या अनेका बद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली कंत्राटदार एन एस चौगुले किसनराव येळळूरकर व इतर अनेकांचा उल्लेख केला कारखान्यातून साखर बाहेर पडली पण ज्यांनी हे स्वप्न पाहिले ते माझे वडील आज हयात नाहीत मात्र त्यांच्या जागी माझ्या वडिलान समान असलेले देवेगौडा आले आहेत असे सांगताना पोतदार गहिवरुन आले.
इसवी सन 2005 सली मी या कारखान्याची सूत्रे हातात घेतली ती सामाजिक जबाबदारी म्हणून आणि अनेकांच्या सहकार्यातून मी तो कारखाना उभा करू शकलो त्यासाठी मी त्यांचा ऋणी आहे ‘सोन्याचा दिन आम्ही पाहिला’ अशा शब्दात अविनाश पोतदार यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली. व्यासपीठावर माजी आमदार शिवपुत्र माळगी मनोहर किणेकर यांच्यासह जिल्हा पंचायत उपाध्यक्ष अरुण कटांबळे रामभाऊ पोतदार यांच्या पत्नी श्रीमती पोतदार व सर्व संचालक उपस्थित होते. संचालकांच्या हस्ते अनेक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला व्यासपीठावर भरत शानभाग नीलिमा पावशे वसुधा म्हाळोजी सुमित पिंगट अनिल कुटरे बसवराज गाणी भाऊराव पाटील परशुराम कोलकार मनोहर होनगेकर, संदीप कट्टी लक्ष्मण नाईक या संचालकासह एमडी मल्लुर हे कार्यकारी संचालक उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी देवे गौडा व अविनाश पोतदार यांचा गौरव केला कारखान्याचे कार्यकारी संचालक एमडी मल्लुर यांच्या प्रयत्नातून हा कारखाना सुरू झाला असे ते म्हणाले. अशा कारखान्यामुळे अनेकांना रोजगार तर मिळतोच पण शेतकऱ्यांची भविष्यही बदलते असे सांगून बेळगावचा साखर उद्योग व बेंगलोर चा कॉपी उद्योग एकत्र आले तर जगावर राज्य करतील असेही ते म्हणाले हा कारखाना चांगला चालेल आणि एक आदर्श कारखाना ठरेल असे ते म्हणाले.