बेळगाव दौऱ्यावर आलेल्या जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांनी पत्रकार परिषदेत आणखी एक बॉम्ब टाकला आहे.आमदार महेश कुमठळ्ळी हे राजीनामा देऊन पुन्हा निवडून आले आहेत.
त्यांच्यामुळेच भाजप सरकार सत्तेवर आले आहे.त्यांना पद मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.जर महेश कुमठळ्ळी जर नाराज असतील तर मी त्यांच्यासाठी मंत्रिपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार आहे असे उदगार बेळगाव शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत काढले .
जारकीहोळी यांच्या विधानामुळे पुन्हा खळबळ उडाली असून जारकीहोळी आपल्या माणसांना पदे मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाहीत हे सिद्ध झाले आहे.रमेश जारकीहोळी हे आपल्या मनात एकदा आले की ते पूर्ण केल्याशिवाय गप्प बसत नाहीत.त्यामुळे आता महेश कुमठळ्ळी याना जारकीहोळी कोणते पद मिळवून देणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.