Monday, December 30, 2024

/

बेळगावनंतर आता लोंढा रेल्वेस्थानकही आयएसओ प्रमाणित

 belgaum

नैऋत्य रेल्वेच्या हुबळी विभागातील बेळगाव मागोमाग आता खानापूर तालुक्यातील लोंढा रेल्वे स्थानकाला देखील पर्यावरण व्यवस्थापन प्रणाली शी संबंधित ‘आयएसओ प्रमाणपत्र’ देऊन गौरविण्यात आले आहे. रेल्वेच्या हुबळी विभागाचे डीआरएम अरविंद यांनी हे प्रमाणपत्र स्वीकारले.

नैऋत्य रेल्वेच्या हुबळी विभागातील हुबळी, धारवाड, बेळगाव आणि वास्को-द-गामा या रेल्वे स्थानकांना अलीकडेच आयएसओ 14001-2015 प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले होते. आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यावरण पूरक तिच्या अनेक कसोट्यांवर पात्र ठरलेल्या लोंढा रेल्वेस्थानकासह होस्पेट, विजापूर, गदग व बेळ्ळारी या रेल्वे स्थानकांनाही इंटरनॅशनल स्टॅंडर्डस् ऑर्गनायझेशन (आयएसओ) प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे नॅशनल ग्रीन ट्रॅब्युनल (एनजीटी) आणि आयएसओ यांच्या मार्गदर्शक तत्वांचे व अटींचे पालन केल्यानंतर हे प्रमाणपत्र देण्यात येते. रेल्वे स्थानक परिसरातील पर्यावरण व्यवस्थापन, आरक्षित कक्ष, स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आदी सुविधांची पाहणी करून आयएसओ प्रमाणपत्र दिले जाते. सदर प्रमाणपत्र तीन वर्षासाठी वैध असते. या तीन वर्षाच्या काळात संबंधित रेल्वेस्थानकाची दरवर्षी पाहणी केली जाऊन त्यांनी आपला दर्जा टिकून ठेवला आहे की नाही? याची पडताळणी केली जाते.

Londha railway station
Londha railway station

निवृत्त रेल्वेच्या अखत्यारीत हुबळी बेंगलोर व म्हैसूर हे तीन विभाग येतात. यापूर्वी हुबळी विभागातील फक्त हुबळी, धारवाड, बेळगाव आणि वास्को-द-गामा रेल्वे याचा रेल्वे स्थानकांना आयएसओ प्रमाणपत्र मिळाले होते. त्यात आता लोंढ्यासह होस्पेट, विजापूर, गदग व बेळ्ळारी या रेल्वे स्थानकांची भर पडली आहे. परिणामी नैऋत्य रेल्वेच्या हुबळी विभागातील आयएसओ प्रमाणपत्र मिळवणार्‍या रेल्वे स्थानकांची संख्या आता 9 झाली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.