के एल ई संस्थेच्या संचालक मंडळाची बिनविरोध निवड झाली असून अध्यक्षपदी महानतेश कौजलगी यांची निवड करण्यात आली.यावेळी कार्याध्यक्ष डॉ.प्रभाकर कोरे यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचे अभिनंदन केले.
यावर्षी के एल ई संस्थेचे बजेट दोन हजार कोटीचे असल्याचे कोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.हुबळीत 600 कोटीचे मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल उभारण्यात येणार असून बंगलोरमध्ये 300 कोटीचे सहाशे खाटांचे हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे.
मुंबईत सरकारकडून चार एकर जागा मिळाली असून तेथे तीस कोटी खर्चून शाळा उभारण्यात येणार आहे.पुण्यातील 259 खाटांचे हॉस्पिटलचे काम पूर्णत्वाला आले असून त्याचे उदघाटन पुढील महिन्यात करण्यात येणार आहे.
बेळगावातील कॅन्सर हॉस्पिटलचे काम जागे अभावी राहिले असून आगामी दीड वर्षात 120 खाटांचे हॉस्पिटल उभारण्यात येईल असा विश्वास कोरे यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना व्यक्त केला.पत्रकार परिषदेला संचालक मंडळ उपस्थित होते.