देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करून हिंडलगा कारागृहात धाडण्यात आलेल्या अभियांत्रिकी शाखेच्या 3 काश्मिरी विद्यार्थ्यांची शुक्रवारी बेंगळूर बार असोसिएशनच्या वकिलांनी चक्क कारागृहात जाऊन भेट घेतल्याने हा एक चर्चेचा विषय बनला आहे.
देशद्रोहाचा आरोप असणाऱ्या काश्मीरी विद्यार्थ्यांची नांवे अमिर, नासिर आणि तालीब अशी आहेत. या अभियांत्रिकी शाखेच्या तीन विद्यार्थ्यांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली होती.
सोशल मीडियावर या तिघाजणांनी पाकिस्तानाच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याचा आरोप आहे. यासंदर्भात बेंगलोर येथील वकीलांनी हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात संबंधित विद्यार्थ्यांची भेट घेऊन चर्चा केल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान देशविरोधी कृत्य करणाऱ्या संबंधित आरोपींबद्दल बेंगलोर बार असोसिएशनचे सदस्य इतकी सहानुभूती दाखवत असल्याबद्दल सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.