कन्नड संघटनेच्या मूठभर कार्यकर्त्यांनी जमून युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या उद्यमबाग येथील हॉटेलमध्ये जाऊन कन्नड फलक मोठ्या आकारात बसवा म्हणून दादागिरी करण्याचा प्रयत्न केला.पोलिसांच्या संरक्षणात आलेल्या या मुठभर कार्यकर्त्यांना शुभम शेळके यांनी दाद दिली नाही.
त्यांनी मराठी बरोबर कन्नड बोर्डही लावला आहे असे सांगितले.पण कन्नड कार्यकर्ते मराठी इतकाच मोठा बोर्ड लावा म्हणून वाद घालत होते.
पोलिसही बघ्याची भूमिका घेऊन कन्नड कार्यकर्त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत होते.शुभम यांनी पोलिसांना तुमची जबाबदारी कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची आहे असे सांगितले.कन्नड कार्यकर्त्यांनी अमुक दिवसात बोर्ड लावा अन्यथा आम्ही बघतो असे म्हणाले .त्यावर त्या कार्यकर्त्यांना शुभम यांनी सज्जड प्रत्युत्तर दिले.
आम्ही मनपा आयुक्तांना सांगून काय करतो बघा असेही धमकवण्याचा प्रयत्न केला.त्यावर शुभम शेळके यांनी आम्ही कायद्यानुसार नियम पळून व्यवसाय करत असल्याचे सांगितले.नंतर पोलिसांनीच त्यांना बाहेर काढले आणि कन्नड कार्यकर्ते तणतणत बाहेर पडले.
या घटनेचा व्हीडिओ पहाण्यासाठी खालील लिंक क्लिक करा
पोलिसी संरक्षणात कानडी गुंड बेळगावात हैदोस घालत आहेत, कानडी बोर्ड लावा नाहीतर बघून घेऊ अशा धमकीचे सत्र बेळगावात सुरू…
Posted by महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव on Sunday, February 2, 2020