मलप्रभा नदीचे पाणी हुबळी धारवाड जुळ्या शहरांच्या आजूबाजूला असलेल्या शेकडो गावांना पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी डी पी आर तयार आहे.या योजनेबाबत आम्ही आपापसात वाद घालणे योग्य नाही.पिण्याचे पाणी सगळ्यांनाच पाहिजे त्यामुळे आंदोलकांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवावेत असा घरचा आहेर अवजड उद्योग खात्याचे मंत्री जगदीश शेट्टर यांनी बेळगावात रोजगार मेळाव्यात बोलताना दिला.
हुबळी,धारवाड आणि रोण सह अनेक गावातील जनता मलप्रभा नदीचे पाणी पिते. आता याच नदीचे पाणी आणखी शेकडो गावांना मिळणार आहे.
त्याची योजना तयार करण्यात येत आहे.त्यामुळे आंदोलकांनी आपापसात भांडू नये.या योजनेसाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात येणार आहे असेही शेत्तर म्हणाले.