कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील केंद्रीय विद्यालय शाळेसमोरील ड्रेनेज पाईपलाईन तुंबून सांडपाणी रस्त्यावर वहात असल्यामुळे शाळेचे विद्यार्थी आणि इजा करणाऱ्या नागरिकांना दुर्गंधी व अस्वच्छतेच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्यामुळे या ड्रेनेजची त्वरित साफसफाई व दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील कॅम्प येथील केंद्रीय विद्यालय शाळेसमोरील इंडिपेंडन्स रोड येथील ड्रेनेज तुंबून सांडपाणी आणि घाण केरकचरा रस्त्यावर वाहत आहे. ड्रेनेज तुंबून वाहत असल्यामुळे या रस्त्यावर सांडपाण्याची तळेच निर्माण झाले आहे. त्यामुळे अस्वच्छता निर्माण होण्याबरोबरच याठिकाणी दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे.
इंडिपेंडन्स रोड या रस्त्यावर केंद्रीय विद्यालय ही शाळा आहे. या शाळेत रविवार वगळता दररोज विद्यार्थी आणि पालक यांची ये-जा असते. त्याचप्रमाणे या मार्गावरून ऑफिसला जाणाऱ्या तसेच अनेक अन्य लोकांचीही मोठी ये-जा असते.
सध्या या रस्त्यावर पसरलेल्या ड्रेनेज तुंबून सांडपाणी आणि घाण केअर कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे येथून ये-जा करणाऱ्यांना नाक मुठीत धरून जावे लागत आहे. केंद्रीय विद्यालय शाळेचे विद्यार्थी आणि पालकांना तर या सांडपाण्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
एखादे भरधाव वेगाने या रस्त्यावरून गेल्यास शालेय विद्यार्थी आणि पादचाऱ्यांच्या अंगावर ड्रेनेजचे सांडपाणी उडण्याचे प्रकार या ठिकाणी घडत आहेत. त्याचप्रमाणे तुंबलेल्या या देण्याच्या सांडपाण्यामुळे येथील वातावरण दूषित झाले असून त्याचा शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. तरी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन या देण्याची त्वरित साफसफाई व दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.