मुलीला शाळेतून आणण्याच्या शुल्लक कारणावरून झालेल्या वादावादीचे पर्यवसान पतीने आपल्या पत्नीचा गळा दाबून निर्घृण खून केल्याची घटना सरस्वती अपार्टमेंट विजयनगर येथे हे घडल्याचे काल गुरुवारी उघडकीस आले.
कविता परशुराम पिसे (वय 30, मूळ रा. गुलबर्गा सध्या रा. विजयनगर) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पोलीसांनी कविताचा पती परशुराम पिसे (मुळ रा. ताळीकोटी जि. विजापूर, सध्या रा. विजयनगर) याला ताब्यात घेतले आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, परशुराम आणि कविता यांचा दहा वर्षापूर्वी विवाह झाला असून त्यांना एक 7 वर्षाची व एक 6 महिन्याची अशा दोन मुली आहेत. परशुराम हा नोकरीनिमित्त सहकुटुंब बेळगाव येथे वास्तव्यास असून तो एका खासगी बँकेत क्लार्कची नोकरी करतो.
पिसे पती-पत्नी येत्या सोमवारी बाळाचे जावळ काढण्यासाठी सौंदत्ती यल्लमा डोंगर येथे ते जाणार होते. गुरुवारी सकाळी याबाबत चर्चा झाल्यानंतर उभयतांमध्ये मुलीला शाळेतून आणण्यावरून जोरदार वादावादी होऊन त्याचे पर्यवसान परशुरामने कविताचा गळा दाबण्यामध्ये झाले. परशुरामने गळा इतक्या ताकदीने दाबला की कविता जागीच गतप्राण झाली होती. मात्र ही वस्तुस्थिती लक्षात न आल्यामुळे बायको बेशुद्ध पडली आहे असे समजून घाबरलेल्या परशुरामने आपल्या घरी विजापूरला तसेच सासुरवाडीला फोन करून गीताने झोपेच्या गोळ्या घेतल्या असल्याची बतावणी केली. त्याच्या घरच्या लोकांनी त्याला कविताला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर परशुराम आपल्या दोन मुलींसह मृतावस्थेत पडलेल्या आपल्या पत्नी शेजारी दिवसभर बसून राहिला. अखेर घरच्या लोकांचा सल्ल्यानुसार काल गुरुवारी रात्री 9.30 वाजता परशुरामने गीताला नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले, तथापि डॉक्टर आणि ती मृत झाल्याचे सांगितले.
दरम्यान याबाबतची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी दाखवलं कविताची पाहणी केली असता तिच्या गळ्यावर गळा दाबण्याचे व्रण आढळून आले. त्यामुळे पोलीस आणि परशुराम याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने कविताचा खून केल्याची कबुली दिली कॅम्प पोलिस स्थानकात याप्रकरणी गुन्हा नोंद झाला असून पोलिस निरीक्षक धीरज शिंदे अधिक तपास करीत आहेत.