होनिहाळ (ता. बेळगाव) येथील बेपत्ता लष्करी जवानाचा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी मृत्यू जवानाची पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली असून अन्य दोन आरोपी फरारी आहेत.
दीपक चंद्रकांत पट्टणदार या खून झालेल्या जवानांची पत्नी अंजली दीपक पट्टणदार (वय 26, रा. होनिहाळ) आणि तिचा प्रियकर प्रशांत दत्तात्रय पाटील (वय 28, रा. होनिहाळ) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील अन्य दोन आरोपी नवीन कंगेरी व प्रशांत हुडेद हे दोघे जण फरारी आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी की, दीपक चंद्रकांत पट्टणदार (वय 32) हा दिल्ली येथे लष्करात सेवा बजावत होता. महिनाभरापूर्वी सुट्टीवर गावी आलेला हा लष्करी जवान गेल्या 28 जानेवारी पासून बेपत्ता होता. मात्र दिपकचा त्याच्या पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने अत्यंत थंड डोक्याने निघृण खून केल्याची आणि कोणाला संशय येऊ नये म्हणून स्वतः पोलिसात तो बेपत्ता झाल्याची फिर्याद नोंदवण्याची धक्कादायक माहिती समोर आली होती.
सुट्टीवर आलेला आपला पती बेपत्ता झाला असल्याची फिर्याद दीपकची पत्नी अंजली हिने गेल्या 4 फेब्रुवारी रोजी दाखल केली होती. दरम्यान दीपकचा भाऊ उदय याने पोलिसात दाखल केलेल्या आपल्या फिर्यादी मध्ये आपली वहिनी अंजली तिच्याबद्दल संशय व्यक्त करून तिने आणि तिचा प्रियकर प्रशांत पाटील यांनी आपल्या भावाचा घातपात केला असावा असा संशय व्यक्त केला होता. पोलिसांनाही संशय आल्याने त्यांनी सदर प्रकरण गांभीर्याने घेऊन गोडचींमलकी (ता. गोकाक) परिसरातील जंगलात तपास केला असता त्यांना त्याठिकाणी काल शुक्रवारी बेपत्ता दीपक याचे धडावेगळे झालेले शिर आढळून आले आहे.
अंजली पट्टणदार हिचे आपला ड्रायव्हर प्रशांत पाटील याच्याशी अनैतिक संबंध होते. यासंबंधांमध्ये पती दीपक याची अडचण होत असल्यामुळे अंजलीने त्याचा कायमचाच काटा काढण्याचे ठरवले. त्यानुसार गेल्या 28 जानेवारी रोजी अंजली आणि प्रशांत यांनी संगनमताने एका गाडीतून (क्र. जीए 07 एफ 6633) आपले मित्र प्रशांत व नवीन कंगेरी यांच्यासमवेत दिपकला गोडचींमलकी (ता. गोकाक) येथे फिरावयास नेले. त्याठिकाणी अंजलीसह प्रशांत व त्याच्या दोन मित्रांनी दीपक पट्टणदार याला यथेच्च दारू पाजली. त्यानंतर नजीकच्या जंगलात नेऊन त्याची निघृण हत्या केली. त्यानंतर कोणाला संशय येऊ नये म्हणून खुद्द अंजलीने आपला पती बेपत्ता झाल्याची तक्रार मारीहाळ पोलिसात नोंदवली होती.
दरम्यान तपासाअंती दीपक याचा खून झाल्याचे निष्पन्न होता आज आज शनिवारी ग्रामीण पोलीस आयुक्त शिवा रेड्डी आणि पोलीस निरीक्षक सिन्नुर यांनी मयत दिपक पट अंधारे यांची पत्नी अंजली आणि तिचा प्रियकर प्रशांत पाटील या दोघांना अटक केली आहे या प्रकरणातील अन्य दोन आरोपी फरारी असून त्यांचा शोध जारी आहे याप्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे.