Wednesday, December 25, 2024

/

करोना व्हायरसला घाबरून नका, घ्या आवश्यक खबरदारी : डॉ. माधव प्रभू यांचे आवाहन

 belgaum

करोना व्हायरसला घाबरून जाऊन धिर सोडण्याची गरज नाही आवश्यक खबरदारी घेतली तर या व्हायरसपासून आपण निश्चितपणे सुरक्षित राहू शकतो. सध्या हा व्हायरस पसरत असला तरी त्याच्या उपचाराबद्दल थोडी माहिती आमच्याकडे उपलब्ध झाली आहे, अशी माहिती केएलई प्रभाकर कोरे हॉस्पिटलमधील डॉ. माधव प्रभू यांनी बेळगाव लाइव्हशी बोलताना दिली.

डॉ. माधव प्रभू पुढे म्हणाले की, करोना व्हायरस पूर्वीपासून भारतामध्ये अस्तित्वात आहे. मात्र आता ‘2019 एनसीओव्ही’ हा नवीन करोना व्हायरस पहिल्यांदाच आढळला आहे. हा व्हायरस नवा असल्यामुळे त्याचे गुणधर्म व किंवा माहिती अल्प प्रमाणात उपलब्ध आहे. तो कसा पसरतो, त्याचा मानवी शरीरावर काय परिणाम होतो किंवा त्याचा इंक्युबॅशन पिरियड अद्याप माहीत झालेला नाही. इंक्युबॅशन पिरियड माहीत नसल्यामुळे हा व्हायरस एखाद्याच्या शरीरात जाऊ शकतो आणि नकळत पसरू शकतो. सर्वसामान्य आजाराप्रमाणेच ताप, सर्दी, अंगदुखी ही या करोना व्हायरसच्या आजाराची लक्षणे आहेत. हा व्हायरस संसर्गजन्य असल्यामुळे 24 तासात तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरू शकतो. गेल्या 14 दिवसात जे कोण चीनला किंवा चीनमधील वुहान प्रांतात केले गेले आहेत, त्यांना व्हायरसची बाधा होऊ शकते. कारण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करोना व्हायरसचा संसर्ग झालेला आहे. वुहान प्रांतात भारतीय विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. त्यामुळेच केरळमध्ये करोना व्हायरसचे दोन-तीन रुग्ण आढळून आले आहेत.

सर्वसामान्यपणे एखादा परिचयाचा व्हायरस मानवी शरीरात शिरला की शरीरातील प्रतिकारशक्ती त्याला विरोध आता अथवा अटकाव निर्माण करते. परंतु करोना व्हायरस हा नवीन असल्यामुळे मानवी शरीरातील प्रतिकारशक्तीला त्याला अटकाव करण्यास वेळ मिळत नाही आहे. त्यामुळेच हा व्हायरस धोकादायक ठरला आहे. करोना व्हायरसची पहिली केस चीनमधील वुहान गावातील फिश मार्केटमध्ये आढळली. याठिकाणी सात – आठ जणांना करोना व्हायरसची बाधा झाल्याचे आढळून आले. त्यामुळे मच्छिमारीतून हा रोग झाला झाला असावा असे म्हटले जात होते. मात्र त्यानंतर आता असे स्पष्ट झाले आहे की हा व्हायरस सर्वसाधारण वटवाघळांमध्येही असतो. त्यामुळे कदाचित हा व्हायरस वटवाघळांकडून आला असावा असाही कयास आहे.सध्याच्या पुराव्यानुसार करोना व्हायरस शिंक किंवा खोकला तसेच काही थोड्या प्रमाणात विष्टेमुळे पसरल्याचे सिद्ध झाले आहे, असे डॉ. प्रभू यांनी सांगितले

करुणा व्हायरसची बाधा होऊ नये यासाठी आपल्याला कांही खबरदारीच्या गोष्टी कराव्या लागतील. जर तुम्ही बाहेर गेलेला असाल आणि तुम्हाला एखादी सर्दी खोकला झालेली आजारी व्यक्ती भेटली तर त्या व्यक्तीला 1 मीटर किंवा 3 फुटांच्या अंतरावर ठेवावे. करोना व्हायरसची लक्षणे ही काही वेगळी नाही. या व्हायरसमुळे सर्वसाधारण सर्दी-खोकल्या प्रमाणेच सर्दी-खोकला होतो, घसा दुखतो, अंग दुखते सर्दी कमी वेळ होऊ शकते पण ती होते. संबंधित व्यक्तींपासून सुरक्षित अंतर ठेवण्याबरोबरच आपण एन नाईंटीन मास्क वापरावयास हवा. तिसरी गोष्ट म्हणजे एखाद्या रुग्णाला भेटल्यानंतर आपले हात डोळे अथवा नाकातोंडाकडे नेऊ नयेत. हात स्वच्छ धुतल्यानंतरच ते आपल्या चेहऱ्याकडे न्यावेत. त्याचप्रमाणे एखाद्या रुग्णाने हाताळलेल्या वस्तू आपण हाताळू नयेत, आणि जर का हाताळल्या तर त्यानंतर आपले हात स्वच्छ धुऊन घ्यावेत. मांसाहारी जेवण चांगले शिजवून खाल्ले पाहिजे. बार्बेक्यू वगैरे कच्चे मांस खाण्याचे प्रकार टाळले पाहिजेत. ताप, खोकला अथवा जास्त अंगदुखी असेल तर त्वरित डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावेत, कारण हा आजार प्राथमिक अवस्थेत बरा होऊ शकतो. तथापी वेळ काढल्यास या आजाराच्या लक्षणांची तीव्रता वाढते आणि निमोनिया होऊन रुग्ण दगावू शकतो.

सध्या सोशल मीडियावर करोना व्हायरस वरील उपचारांचा संबंधी अनेक सल्ले दिले जात आहेत. परंतु अद्याप असा कोणताही रामबाण उपाय करोना व्हायरसच्या बाबतीत सध्यातरी उपलब्ध नाही यावर एकच उपाय म्हणजे आवश्यक खबरदारी घेणे हे होय. विशेष करून आपले हात चेहऱ्याकडे नेण्यापूर्वी ते स्वच्छ धुतलेले असावेत याची दक्षता घेणे हे होय. कोणत्याही व्हायरसला घाबरून जाऊन धीर सोडण्याची गरज नाही. करोना व्हायरस संदर्भातील उपचाराची थोडी माहिती केएलई हॉस्पिटलकडे उपलब्ध झाली आहे, असेही डॉ. माधव प्रभू यांनी बेळगाव लाइव्हशी बोलताना स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.