राज्याचे आरोग्यमंत्री श्रीरामलू यांनी नुकतीच बेळगावला भेट दिली आहे. या भेटीदरम्यान त्यांनी भाजप नेत्यांना आपल्या मुलीच्या लग्नाचे आमंत्रण दिले आहे. सध्या राज्यात भाजप सरकार असल्याने आणि हे आमंत्रण आवर्जून दिले आहे.
बेळगाव येथे आल्यावर आरोग्यमंत्री श्रीरामुलू यांनी आपल्या मुलीच्या लग्नाचे आमदार आणि भाजप नेत्यांना आमंत्रण दिल्यामुळे चर्चा ही जोरात सुरू आहे. हे सर्व नेते लग्नाला जाणार का असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
रविवारी बेळगाव येथील एका विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात आरोग्यमंत्री श्रीरामुलु आले होते. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष आमदार खासदार यांच्या भेटीगाठी घेऊन निमंत्रण पत्रिका दिले आहेत. सध्या राज्यात भाजप सरकार यांची सत्ता असल्याने हे लग्न जोरात होणार अशी चर्चा सुरू आहे.
श्रीरामलू बळळारी येथील असून ते रेड्डी बंधूंचे निकटवर्तीय मानले जातात रेड्डी बंधूंच्या मुलीच्या लग्नाची चर्चा देश भरात झाली होती आता रामलु यांच्या कन्येचा विवाह आहे विशेष म्हणजे राज्यात भाजपचे सरकार आहे.