एच १ एन १ या विषाणूची लागण होणाऱ्या स्वाईन फ्लूच्या तपासणीसाठी उत्तर कर्नाटकात एकही प्रयोगशाळा नसल्याची बाब धक्कादायक ठरत आहे. एकीकदे या रोगाची लागण वर्षाकाठी वाढत असताना उत्तर कर्नाटकातीत एकाही इस्पितळात राज्य आरोग्य मंत्रालयाने सोय केलेली नाही. यामुळे आवश्यक चाचणीसाने बेंगळूर व मणीपात येथील प्रयोगशाळांचा आसरा घ्यावा लागत आहे.
याची तातडीने दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे. मागील दोन ते तीन वर्षांत उत्तर कर्नाटकात या रोगाचा फैलाव वाढताना दिसत आहे. काही जणांनाचा मृत्यूही झाला आहे. दर वर्षाला संशयित रुग्णांची संख्या वाढत आहे. उत्तर कर्नाटकातील सर्व जिल्हा इस्पितळात संशयीत रुग्ण आढळून येत अतसाना या गंभीर रोगावर उपाय योजना करण्यासाचे राज्य सरकार डोळेझाक करत असल्याचे दिसून येत आहे.
एखादा रुग्ण संशयीत आढळल्यास त्याच्यावर आवश्यक त्या चाचण्या कराव्या लागतात. मात्र ही सोय स्थानिक पातळीवर कोठेच उपलब्ध नसल्याने रोगाचे निदान होईतीवर रुग्णाची स्थिती योग्य उपचाराविना दयनीय होवू लागली आहे. स्वाईन फ्लू वरील उपचारांसाचे सर्व जिल्हा इस्पितळांमध्ये सर्वत्र याबाबत गामभिर्याने पाहणे आवश्यक आहे.
खोकला, अगदुखी आदी लक्षणे आढळल्यास आवश्यक चाचण्यांसाठी सर्व नमुने बैंगळूर आणि मणीपालता पाठविले जातात. विजापूर, गुलबर्गा, बेळगाव, गदग धारवाह हावेरी बागलकोट, बिदर येथील जिल्हा इस्पितळातून चाचण्यांसाठीचे नमूने बेंगळूर किंवा मणीपालता पाठविल्यानंतर योग्य निदानासाठी ७२ तासांचा कालावधी लागत लागतो. इस्पितळातून प्रयोग शाळांपर्यंत संबंधित नमूने पोहोचविणाऱ्या आरोग्य सहायकांनाही प्रशिक्षणाचा अभाव असल्याचे जाणवत आहे. मागील दोन वर्षांपासून गरज असूनचे उत्तर कर्नाटकात प्रयोग शाळा उभारणीकडे कर्नाटक सरकारचे दुर्लक्ष होत आहे. उत्तर कर्नाटकात हुबळी , किवा बेळगाव येथील जिल्हा इस्पितळांत प्रयोग शाळा उभारल्यास त्याचा लाभ होवू शकणार आहे. मात्र याकडे सरकार कधी लक्ष देणार असा प्रश्न उपस्थित माता आहे.