पी डी ओ अर्थात पंचायत विकास अधिकारी यांना होणारा मानसिक त्रास कमी करा अशी मागणी बेळगाव तालुका पंचायत विकास अधिकारी संघटना आणि सरकारी नोकर संघटनेने केली आहे.तहसीलदार आणि तालुका पंचायत सी ई ओ कलादगी यांना निवेदन देत ही मागणी करण्यात आली आहे.
पी डी ओ वरील वाढता ताण त्यांना त्रास दायक ठरत आहे त्यांना शारिरीक आणि मानसिक छळ केला जात आहे अश्यावर कारवाई करा अशी देखील मागणी करण्यात आली आहे.
पी डी ओ यांच्यावर हल्ले होण्याच्या घटनेत वाढ झाली आहे वारंवार अश्या घटना होत आहेत मात्र याकडे कोणीच लक्ष देताना दिसत नाही ग्राम पंचायत मधील केवळ पी डी ओ नव्हे तर सेक्रेटरी,क्लार्क,प्रथम श्रेणी,द्वितीय श्रेणी लेखा सहाययक व इतर कर्मचारी असुरक्षित आहेत त्यामुळे ग्राम पंचायती मध्ये होणारे वाद हे अनेकांना त्रास दायक ठरताहेत.
वयक्तिक हेवेदावे करणारी राजकीय मंडळी विकासाकडे दुर्लक्ष करून कोणतेही काम झाल्यास ते असेच का झाले तसेच का झाले असे विचारत वादा वादी करतात त्यामुळे मानसिक ताण वाढत चालला आहे.पी डी ओ याना यातून बाहेर काढण्यासाठी सरकारनें उपाय योजना हाती घ्यावी अशी देखील मागणी झाली आहे