लहानपणीच्या आठवणी प्रत्येकजण आपल्या हृदयाच्या कप्प्यात साठवून ठेवतो अश्याच लहानपणीच्या आठवणी तब्बल 32 वर्षानी हलगा येथील प्राथमिक शाळेच्या माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी ताज्या केल्या…
निमित्त होते 1987 सालच्या सातवीच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याचे… तब्बल 32 वर्षांनी हे माजी विद्यार्थी विद्यार्थिनी शाळेत जमले होते शाळेत एकत्र येऊन त्यांनी शाळेला प्रोजेक्टर व सरस्वती फोटो फ्रेम भेट दिली व अनेक आजी माजी गुरुजनांचा सत्कार केला.
सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थ्यांनी आईस्क्रीम वितरित केले.
हलगा प्राथमिक शाळेची स्थापना होऊन 173 वर्षे झाली आहेत पूर्व भागातील एक जुनी प्रायमरी शाळा म्हणून या शाळेकडे पाहिलं जातं मात्र या शाळेत माजी विद्यार्थ्यांचे स्नेह मेळावे कधीच झाले नाहीत मात्र 1987 बॅच सातवीत शिकलेल्या मुला मुलींनी छोटे खाणी स्नेह मेळावा आयोजित केला होता.,
कार्यक्रमाचे सुरवात मुलीच्या स्वागत गीताने झाले त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती फोटो पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत शाल आणि श्रीफळ देऊन केले.यावेळी पाहुण्यांची भाषणे झाली माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. शाळेची पटसंख्या कशी सुधारावी शिक्षणाचा दर्जा कसा वाढवावा
माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.173 वर्ष जुन्या शाळेच्या हयात असलेल्या आजी माजी विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन आयोजित करण्या बाबत अनेकांनी विचार मांडले.
यावेळी भारतीय सैन्यात सेवा बजावत असलेले परशराम हनुमंताचे आणि एस डी एम सी अध्यक्ष असलेले किरण हनुमंताचे व जयश्री चलवादी(मुंबई) या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी शारदा गर्ल्स शिक्षकवर्ग प्राथमिक शाळेचे शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.