Wednesday, November 20, 2024

/

मोफत जलतरण प्रशिक्षण शिबिराचा झाला उत्साहात शुभारंभ

 belgaum

स्विमर्स क्लब बेळगाव आणि एक्वेरियस स्विम क्लब बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिव्यांग आणि गोरगरीब मुलामुलींसाठीच्या 19व्या भव्य मोफत जलतरण प्रशिक्षण शिबिराला शुक्रवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.

गोवावेस येथील रोटरी कॉर्पोरेशन स्विमिंग पूल येथे येत्या 29 फेब्रुवारीपर्यंत सलग 21 दिवस रविवार वगळता दररोज सायंकाळी 6.30 ते 7.30 या वेळेत हे शिबिर आयोजित केले जाणार आहे. रोटरी कार्पोरेशन स्विमिंग पूल येथे शुक्रवारी प्रमुख पाहुणे महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने या शिबिराचे उद्घाटन झाले. आपल्या उद्घाटनपर भाषणात जगदीश यांनी आयोजकांच्या कार्याचा गौरव करून शिबिरार्थींना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी महापालिकेचे कार्यकारी अभियंता गंगाधर, सहाय्यक कार्यकारी अभियंता महांतेश नरसन्नावर बसवराज विभुते, अॅड. सचिन बिच्चू, उमेश कलघटगी, सुधीर कुसाळे, सूर्यकांत हिंडलगेकर, मधुकर बागेवाडी, कल्लाप्पा पाटील आदी उपस्थित होते.

अपंग अंध मतिमंद मूकबधिर अशी दिव्यांग मुले मुली तसेच गोरगरीब मुले अशा सुमारे दोनशेहून अधिक मुला-मुलींचा या मोफत जलतरण प्रशिक्षण शिबिरात सहभाग आहे या सर्व मुलांना जलतरण प्रशिक्षण व्यतिरिक्त वाहतुकीची व्यवस्था, जलतरणाचे साहित्य आणि आवश्यक खुराक हे सर्व काही मोफत पुरविले जात आहे.

Swimming
Swimming camp for diffrently able childrens

वर्षभरातील स्पर्धात्मक प्रशिक्षणा मधील कामगिरी लक्षात घेऊन उपरोक्त मुला-मुलींची या शिबिरासाठी निवड करण्यात आली आहे आता त्यांना नियोजनबद्ध शास्त्रोक्त प्रशिक्षण देऊन जलतरण स्पर्धांसाठी तयार केले जाणार आहे गेली अठरा वर्षे स्विमरस क्लब आणि एक्वेरियम क्लबतर्फे मोफत जलतरण प्रशिक्षण शिबिराचा हा भव्य उपक्रम राबविला जातो याची फलनिष्पत्ती अशी आहे की की या शिबिरात प्रशिक्षण घेतलेल्या सात जलतरणपटू विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये हे भारताचे प्रतिनिधित्व करत एकूण 49 हून अधिक पदके मिळविली आहेत सदर शिबिरातून प्रशिक्षित होऊन बाहेर पडलेल्या शेकडो दिव्यांग व गोरगरीब जलतरणपटू राष्ट्रीय स्तरावर 500 हून अधिक पदके मिळवली आहेत.

या प्रतिभावंत जलतरणपटूमध्ये राघवेंद्र अणवेकर, राजेश शिंदे, मोईन जूनैद, उमेश खाडे, श्रीधर माळगी, सिमरन गौंडाळकर, आतिष जाधव आदींचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. याखेरीज स्वस्तिक पाटील सहील जाधव आणि सिमरण गौंडाळकर या जलतरणपटूंना खेलो इंडिया प्रकल्पासाठी भारत सरकारने दत्तक घेतली आहे. या तिघांना सध्या भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या गुजरात येथील केंद्रात तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रगत जलतरण प्रशिक्षण दिले जात आहे.

सदर मोफत जलतरण प्रशिक्षण शिबिराच्या आयोजनासाठी स्विमर्स क्लब बेळगाव आणि एक्वेरियस स्विम क्लब बेळगाव यांना रोटरी क्लब ऑफ बेळगाव, केएलई युनिव्हर्सिटी, जयभारत फाउंडेशन, पॉलीहायड्रॉन फाउंडेशन, डायमंड मेडल स्क्रीन, महेश फाउंडेशन, डॉ. अनंत जोशी (मुंबई), रोशन सिंगनमक्की, सीबीएएलसीचे विद्यार्थी आदींचे सहकार्य लाभत आहे

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.