बेळगावात अन्नदान करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे तीन ठिकाणी फूड बॉक्स ठेऊन गरजुना अन्नदान देण्यात येत आहे.
2018 जानेवारी महिन्यात सर्वप्रथम ही संकल्पना टिळकवाडी पहिले गेट येथील कला मंदिर समोर पुरोहित सिलिब्रेशन्स मध्ये तो सुरू करण्यात आली होती त्या नंतर हॉटेल नियाज मध्ये रोटरी कलब ने हा बॉक्स बसवला होता त्या नंतर आता जे एन एम सी मध्ये हॅपी बॉक्स बसवण्यात आला आहे
गरिब आणि भुकेले याना खायला मिळावे.गरीब आणि भुकेले उपाशी राहू नयेत या उद्देशाने के एल इ डेंटल कॉलेजच्या रेड क्रॉस युनिटने फिडिंग इंडियाच्या मदतीने कम्युनिटी रेफ्रिजरेटरची संकल्पना साकार केली आहे.जे एन मेडिकल कॉलेजच्या आवारात असणाऱ्या शिव मंदिराजवळ हा रेफ्रिजरेटर नुकताच ठेवण्यात आला आहे.
या रेफ्रिजरेटरला हॅपी फ्रीज असे नाव देण्यात आले आहे.काहेरचे उप कुलगुरू डॉ विवेक सावजी यांच्या हस्ते या रेफ्रिजरेटरचे अनावरण करण्यात आले.घरात असलेले जास्तीचे किंवा शिल्लक राहिलेले अन्न, खाद्यपदार्थ या फ्रीजमध्ये आणून ठेवायचे आहेत.नंतर हे अन्न गरीब आणि भुकेल्याना देण्यात येणार आहे.
टिळकवाडी येथील पुरोहित सेलिब्रेशन मध्ये बसवलेला हा फूड बॉक्स म्हणजे एक फ्रीज आहे. ज्यात गरीब लोक आपल्याकडे उरणारे अन्न, फळे, भाज्या आणून ठेऊ शकतात, उरणार अन्न खराब होऊ नव्हे म्हणून हा उपक्रम आहे. आपल्याला हवे असेल तेंव्हा येथे ठेवलेल्या वस्तू घेऊन जाता येतील.
सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत हा फूड बॉक्स खुला असतो. साधारणपणे शाकाहारी पदार्थ ठेवतात आणि ते कधीपर्यंत टिकतील तितकाच काळ ठेवावेत इतकाच नियम आहे.हॉटेल नियाज समोर रोटरी क्लब ऑफ बेळगाव दक्षिण आणि हॉटेल नियाज यांच्या संयुक्त विध्यमने 24 तास फ्रीज अन्न बॉक्स ठेवण्यात आला होता.
बेळगावच्या जिल्हा रुग्णालया समोर दररोज 150 लोकांना अन्नदान करण्याचं काम सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर करत आहेत.तीन ठिकाणी सुरू असलेले फूड बॉक्स आणि सिव्हिल इस्पितळा समोर दररोज जेवण देणारे सुरेंद्र अनगोळकर यांच्यामुळे निश्चितच बेळगावतल्या अनेकांची भूक भागवत आहेत.