Sunday, September 8, 2024

/

मनमानी कारभारामुळे हे कुटुंब नुकसानभरपाई पासून वंचित

 belgaum

मागील  वर्षी अतिवृष्टीने आहाकार माजला. शेतीतर पाण्याखाली गेलीच पण अनेक शेतकऱ्यांची घरंही पडून नुकसान झाले. सरकारने वर्गवारी करुन घरं बांधण्यासाठी निधिहि मंजूर केला.मात्र अनेक अधिकाऱ्यांनी याची वाट लावली आहे. याचा विचार करून यापुढेतरी नुकसान भरपाई करून द्यावी अशी मागणी होत आहे.

प्रत्येक भागातील नेमलेल्या अधिकाऱ्यांनी पहाणी करुन अहवाल दिला. तसा रयत गल्लीतील कांही घरं पावसाने पडली होती. त्यांचाहि अहवाल घेऊन अधिकारी गेले. पण पूढे काय झाल याचा थांगपत्ताही लागत नाही. याची शहनिशा करता हे सर्व धन्यास कण्या,चोरास मलिदा असेच आशिच अवस्था झाली आहे.

रयत गल्लीतील गरीब शेतकरी कुटूंबातील महिला श्रीमती अर्चना शिवाजी बिर्जे.वय साधारण ३५/४०.तीन मुली,नवरा अल्पशा आजाराने निवर्तला. वयस्कर सासरा, अर्धा एकर शेती, पूराने त्यातील भातपीकं वाया गेले आहे.

घरगाडा चालवण्यासाठी दुसऱ्यांची धूनी भांडी घासून पोटाची खळगी भरत असतानांच गेल्या अतिव्रूष्टिने असलेल्या घराच्या भिंती कोसळल्या. घरी कोण नसतानां भिती कोसळल्या आहेत. याबाबत सर्व तलाठी व संबधित अधिकाऱ्यांना कळवले. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.

प्रत्यक्ष येऊन फोटो, पंचनामा करुन गेले असताना याकडे दुर्लक्ष करून नुकसान देण्यात आली नाही. सदर कागदपत्र हजर केली. पण अजूनही या विधवा महिलेला एक रुपया मदत मिळाली नाही. चौकशी केल्यावर पून्हा वेगवेगळी कागदपत्र देण्याचा तगादा लावण्यात येत आहे. अनेकांची घर सुस्थितीत असलेल्यानां निधी मीळाला पण ज्या विधवा महिलेच घर कोसळलय त्यांना मात्र अनेक नियम ? हा कसला न्याय ? संबधित अधिकारी आणी लोकप्रतिनिधींनी या असहाय्य गरीब शेतकरी महिलेचा प्रामाणिकपणे गांभीर्याने विचार करुन ताबतोब मदत निधी त्यांना वितरित करुन कुटूंबाला जगण्याची मुभा द्यावी अशी त्या महिलेसाठी रयत गल्लीतील समस्त शेतकरी कुटूंबियांची विनंती आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.