पर्यावरण वाचवणे आवश्यक आहे, असे नुसते म्हणून चालणार नाही तर त्यासाठी कृतिशील पावले उचलणे देखील आवश्यक आहे. अशीच कृतिशीलता केंद्रीय विद्यालय क्र.1 एएफएस सांबरा या शाळेतील एका मुलाच्या पालकांनी दाखवून दिली.
केंद्रीय विद्यालय क्र .1 एएफएस सांबरा या शाळेमध्ये सरकारच्या पुढाकाराने पर्यावरण संरक्षणासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जात आहे. केंद्रीय विद्यालय क्र .1 शाळेतर्फे मुलांना पर्यावरणाचे महत्त्व कळावे यासाठी त्यांच्यामध्ये वृक्षारोपणाची आवड निर्माण केली जात आहे. या उपक्रमातूनच जवळपास 800 रोपे लावण्यात आली आहेत.
विद्यार्थ्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध झाडांची रोपे आणून विद्यालयाच्या प्रांगणात तसेच आवश्यक ठिकाणी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचे कार्य केले जात आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून आज रविवारी इयत्ता पहिलीचा विद्यार्थी एस.एस. लातुरन याचे पालक श्री. शिवकुमार यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त शाळेला भेट म्हणून 50 रोप दिली.
यावेळी बोलताना केंद्रीय विद्यालय क्र .1 एएफएस सांबराचे प्राचार्य सी. विजय रत्नम यांनी
या मुलाच्या आईवडिलांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त दिवशी शाळेला 50 रोप देवून आपल्या मुलाचा जन्मदिन आगळ्या वेगळ्या पध्दतीने साजरा केला आहे असे सांगितले. तसेच अन्य मुलांच्या पालकांनी याचे अनूकरण करून झाडांसह पर्यायाने पर्यावरण संवर्धनास मदत करावी, असे आवाहनही केले.
कार्यक्रमास मुख्याध्यापिका कांता कांबळे, ज्येष्ठ शिक्षिका एन. पार्वती, सुरेखा काळे, बसवराज बी. के. यांच्यासह वर्गशिक्षीका शालिनी यादव अन्य शिक्षक व विद्यार्थि बहुसंख्येने उपस्थित होते. केंद्रीय विद्यालय क्र .1 एएफएस सांबरा ही शाळा हिरवळ वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच मुलांमध्ये चांगल्या सवयी विकसित करीत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.