क्रिकेट खेळताना लहान मुलांचा हरवलेला चेंडू एका मूक जनावरासाठी देवदूत ठरला आहे.
बेळगाव शहरातील विश्वेश्वरय्या नगरात लहान मुलांच्या क्रिकेट खेळायच्या चेंडूने रेडकाला जीवनदान दिले आहे.
रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने विश्वेश्वरय्या नगर येथील के आय जी डी ऑफिस समोर लहान क्रिकेट खेळत होती यावेळी टोलवलेला चेंडू गटारीत पडला हा चेंडू शोधतेवेळी रेडकू गटारीत अडकल्याचे लक्षात आले.
सदर रेडकू गटारीत अडकले होते याकडे कुणाचेही लक्ष गेले नव्हते गटारीतून त्या मूक जनावरांस काढण्याचा प्रयत्न झाला मात्र मुलांना ते जमलं नाही शेवटी त्यांनी अग्निशामक दलास पाचारण केले.
अग्निशामक दलाच्या जवानांनी विश्वेश्वरय्या नगरला जाऊन रेडकाला गटारी बाहेर काढत जीवदान दिले.जर का मुलांचा चेंडू गटारीत गेला नसता तर गटारीत फसलेल्या रेडकाकडे कुणाचेच लक्ष गेले नसते म्हणून हरवलेला चेंडू रेडकाच्या जीवनात देवदूत बनून आल्याची चर्चा ईथे पहायला मिळाली.