महानगरपालिका निवडणूक केव्हा होणार माहिती नाही पण आत्ताच नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्यामध्ये हाणामारी सुरू झाली आहे.आझाद नगर मध्ये ही मारहाणीची घटना घडली.दोन गटात हाणामारी ,झाली.त्यात जखमी तरुण झाला आहे.
एक आठवड्या पूर्वी मी मोठा की तू मोठा यावरून एक आठवड्यापूर्वी मारामारी झाली होती.आज पुन्हा तो वाद पुन्हा उफाळून आला.आणि तरुणांच्या एका गटाने दुसऱ्या गटावर हल्ला केला.यात तरुण जखमी झाला असून याची मालमारुती पोलिसात नोंद झाली आहे.
आझाद नगर भागात मागील काही महिन्यांपूर्वी देखील दोन गटात हाणामारी झाली होती माळ मारुती पोलिस निरीक्षक बी आर गड्डेकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.