वडिलांनी ऑनलाईन जॅकेट खरेदी करुन देण्यास नकार दिल्याने बसुर्ते गावात नववीत शिकणाऱ्या मुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सुभाष गजानन हन्नुरकर (वय 15) असे आत्महत्या केलेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे हा नवव्या इयत्तेत शिकत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुभाष
याने आज सोमवारी सकाळी दोरीच्या सहाय्याने घरातील हुकाला फास लाऊन आत्महत्या केली.
याप्रकरणी काकती पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल पासून ऑनलाइन जॅकेटची निवड करून ठेवली होती आणि वडिलांकडे जॅकेट खरेदी करून द्या असा तगादा लावला होता वडिलांनी ऑनलाइन ऐवजी दुकानातून जॅकेट आणून देतो असे सांगितले होते तरी ऑनलाईन जॅकेट हवे यासाठी त्याने फास लाऊन घेत आत्महत्या केली आहे
अनगोळ येथे तरुणीची आत्महत्या
कणकदास कॉलनी, आंबेडकरनगर, अनगोळ येथील एका तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली आहे. टिळकवाडी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नाही.
नेत्रावती माळाप्पा तल्लूर (वय 23) असे त्या तरुणीचे नाव आहे. नेत्रावतीचे कुटुंबिय मुळचे बैलहोंगल तालुक्यातील नेगीनाळचे. वडील एका इमारतीवर रखवालदार काम करतात. ती आपल्या कुटुंबियांसमवेत सध्या अनगोळ येथे राहत होती.
घरात कोणी नसताना नेत्रावतीने गळफास घेऊन आपले जीवन संपविले आहे. घटनेची माहिती मिळताच टिळकवाडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देवुन पंचनामा केला. त्यानंतर चिा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात हलविण्यात आला. पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर पुढील तपास करीत आहेत.
रुक्मिणी नगर येथे तरुणाची आत्महत्या
रुक्मिणी नगर (कोंचीकोरवर गल्ली ) येथील एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. आजाराला कंटाळून त्याने आपले जीवन संपविल्याचे पोलिसांनी सांगितले. यल्लाप्पा दुंडाप्पा जिल्लण्णावर (वय 27) असे त्याचे नाव आहे. दोन वर्षांपूर्वी यल्लाप्पाने आपल्या तीन मुलांना विष घातला होता. सुदैवाने तीनही मुले बचावली होती. पlनीने दिलेल्या फिर्यादीवरुन माळमारुती पोलीस स्थानकात त्याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला होता. दोन वर्षांपूर्वी स्वतःच्या मुलांचा खुनाचा प्रयत्न करणार्या यल्लाप्पाने गळफास घेऊन आपले जीवन संपविले आहे. माळमारुती पोलीस स्थानकात या संबंधी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करुन त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर पुढील तपास करीत आहेत.