मागील विधानसभा निवडणुकीत ग्रामीण मतदार संघात भाजपचे उमेदवार संजय पाटील यांना पराभूत करण्यासाठी आणि काँग्रेसच्या नेत्या लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विजयासाठी झटलेले मंत्री रमेश जारकीहोळी यांनी संजय पाटील यांच्या सोबत यांच्या सोबत असलेल वितुष्ट संपवण्याचे संकेत दिले आहेत.
गोकाक मध्ये रमेश जारकीहोळी यांच्या सत्कार समारंभात दोघेही एकाच मंचावर होते त्यावेळी रमेश यांनी संजय यांच्या बाबत आपण केलेली चूक मानत संजय पाटील यांच्यावर अन्याय झाल्याचे सांगत भविष्यात त्यांना मदत करण्याचे आश्वासन देऊन टाकले आहे .
दोघांनी एकमेकांचें कौतुक करून टाकले स्तुती सुमन उधळली.रमेश जारकीहोळी हे जलसंपदा मंत्री होतील ते बोललेलं करून दाखवणारे राजकारणी आहेत अशी प्रशंसा संजय पाटील यांनी केली.
संजय पाटील यांच्या पराभवास रमेश जारकीहोळी बऱ्याच अंशी कारणीभूत आहेत कारण ग्रामीण मतदारसंघात मागील वेळेस लक्ष्मी यांच्या पाठीशी रमेश खांबा प्रमाणे उभे होते हे सर्वश्रुत आहे. मागील महिन्यात त्यांनी पोट निवडणूक जिंकताच इथून पुढे आपण ग्रामीण बेळगाव मतदारसंघावर लक्ष केंद्रित करू असे सांगत मराठा उमेदवारी देण्याची देखील मागणी केली होती त्यांचे मराठ्यांच्या बाबत वक्तव्य खुप गाजलं देखील होत मात्र आता त्यांनी संजय पाटील यांना पाठिंबा दिला आहे.
ग्रामीण मतदारसंघात महाराष्ट्र एकीकरण समितीने आपलं अस्तित्व गमावलं असताना भाजप बळकटी घेऊ लागलं आहे रमेश आणि संजय यांच्या दिल जमाईने ग्रामीणच्या आक्काचे मात्र टेन्शन वाढले असेल.एरव्ही मराठा कार्ड खेळू पहाणारे रमेश जारकीहोळी ग्रामीण मतदारसंघात नॉन मराठा असलेल्या संजय पाटील यांना बॅक करत ग्रामीण मतदार संघावर नजर ठेवली आहे मात्र मराठा नेता तयार करण्यापासून दूर सरकले आहेत.