मंत्रीपद मिळाले नसल्यामुळे नाराज झालेल्या आमदार उमेश कत्ती यांनी अखेर मौन सोडून आपल्या मनातली खदखद प्रसार माध्यमांसमोर व्यक्त केली आहे.तेरा वर्षे मी मंत्री म्हणून कार्य केले आहे.
येडीयुरप्पा ज्या स्थानावर आहेत ते स्थान मला मिळाले पाहिजे.त्या दृष्टीने माझे प्रयत्न सुरू आहेत.देवाचा आशीर्वाद लाभला तर मी नक्कीच मुख्यमंत्री होईन असे म्हणून उमेश कत्ती यांनी बॉम्ब टाकला आहे.
माझ्या योग्यतेचा विचार केला तर मला मंत्रीपद मिळालेच पाहिजे आणि येडीयुरप्पा असलेले स्थान देखील मला मिळाले पाहिजे. पराभूत झालेल्या सवदी यांना आणि एकदा निवडून आलेल्या श्रीमंत पाटील यांना मंत्रीपद मिळाले आहे ,तुम्हाला का मंत्रीपद मिळाले नाही असा प्रश्न विचारल्यावर माझ्यापेक्षा त्यांची योग्यता अधिक आहे.
माझी योग्यता कमी आहे.याविषयी त्यांनाच जावून विचारा असे कत्ती म्हणाले.मी हुक्केरीचा आमदार म्हणून कार्य केले आहे.मंत्री कोणीही होऊदे मी त्यांचे स्वागत करतो असे कत्ती म्हणाले.