बेळगाव महानगरपालिकेच्या हद्दीत आता मोठ्या प्रमाणात कामांना चालना देण्यात आली आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत विविध रस्त्यांची खोदाई करण्यात आले आहे. मात्र रस्त्यांची कामे अर्धवट टाकल्याने नागरिकांना धुळीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अनेक नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून यापुढे मनपाने मास्क द्यावेत अशी मागणी होत आहे.
महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांमुळे अनेक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ही समस्या कधी एकदा मिटणार असेच सर्वांना वाटत आहे. मात्र याचा विचार करून महानगरपालिकेने कोणतीच कार्यवाही केली नाही. याचे गांभीर्य हरवलेल्या महानगरपालिकेने यापुढे तरी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी अशी मागणी होत आहे.
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बेळगाव शहरातील रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र या रस्त्यांची कामे दिरंगाईने करण्यात येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मोठ्या प्रमाणात धुराचे लोळ असून अनेकांच्या नाकाद्वारे ते शरीरात जाऊन आजारी पडण्याची लक्षणे वाढले आहेत. त्यामुळे ही सारी समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिका कोणती भूमिका घेणार किंवा तातडीने रस्ते काम पूर्ण करणार अशी मागणी होत आहे.
एखाद्या रस्त्याला किती दिवस लावावेत हे काही सांगता येत नाही. या दरम्यान महानगरपालिकेच्या कार्यभारा बद्दल वारंवार संताप व्यक्त होत असतानाच आता धुळीच्या समस्येमुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे महानगर पालिकेने नागरिकांना मास्क का वाटू नयेत असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे.