बनावट दुधाची निर्मिती करणाऱ्या ठिकाणी पोलिसांनी छापा मारून दूध निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले आहे.अथणी तालुक्यातील झुंजरवड येथे जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
उमरअली अन्सारी (23) असे पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे.पाचशेहून अधिक लिटर बनावट दूध,पाम तेलाचा साठा आणि पांढरी पावडर असे बनावट दूध निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले आहे.
पाचशेहून अधिक लिटर बनावट दूधही सापडले आहे.जिल्हा पोलीस प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निंगणगौडा पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.