महाराष्ट्र (कास पठार )येथे आर्यांग्ला मेडिकल कॉलेज हॉस्टेल माजी विद्यार्थी संघटनेच्या स्नेहसंमेलनप्रसंगी उल्लेखनीय सामाजिक व वैद्यकीय सेवेबद्दल महाराष्ट्रातील विविध भागातून आलेल्या डॉक्टर मंडळींनीतर्फे डॉ. संजय पंतबाळेकुंद्री (अकोळ) यांचा खास सत्कार करण्यात आला.
सातारा कास पठार येथे डॉ. अविनाश पाटील (कराड), डॉ. अशोक कामत (कोकण), डॉ.अनिल शिंगे, (सातारा), डॉ. संतोष अक्कोळे(सांगली) व डॉ. भरत कडलास्कर, यांच्या हस्ते हा सत्कार सोहळा पार पडला. सूत्रसंचालन डॉ. सुरेखा काळे (वेंगुर्ला) व डॉ. मिताली कुलकर्णी (पुणे) यांनी केले. महाराष्ट्राच्यातील विविध भागात वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत यशस्वीपणे कार्यरत असणारे डॉ. भरत कडलास्कर (उस्मानाबाद) व डॉ.विजय शिंदे (शिरवळ) यांनाही त्यांनाही विशेष कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी कॉलेजमेट्स व होस्टेलमेट्स परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. संजय पंतबाळेकुंद्री यांचा पुरस्काराने सन्मानित करताना त्यांच्या कार्याची ओळख करून देण्यात आली, ती पुढीलप्रमाणे आहे – डॉ. संजय अरुण पंतबाळेकुंद्री.(BAMS. C.G.O.). अक्कोळ (जि. बेळगांव) येथे गेली 27 वर्षे डॉ. श्रद्धा पंत यांच्यासमवेत निरंतर वैद्यकीय सेवा. अकोळ ग्रामीण भागात गेली तीन पिढ्या अहोरात्र निरंतर वैद्यकीय सेवा सुरू आहे.लवकरच चौथी पिढी पण यात सहभागी होईल. विश्वासाची व श्रद्धेची -वैद्यकीय सेवेतील शंभर वर्ष पूर्ण. निपाणी ,कोल्हापूर, सांगली, आजरा ,रायबाग ,गडहिंग्लज, नेसरी ,गोकाक, इचलकंजी, भागातील पेशंटसाठी विश्वासाचे उपचार केंद्र म्हणून ख्याती. नुकत्याच झालेल्या अवकाळी पूर परिस्थितीप्रसंगी पूरग्रस्तांना डॉ. सौ. श्रध्दा यांच्या सहकार्याने स्वतः वैद्यकीय मदत पोहचवली. अक्षरशः 8 दिवस अहोरात्र पुरग्रस्तांची विनामूल्य सेवा करताना स्वतः च्या तब्बेतीचा पण विचार केला नाही.
गेली 20 वर्षे विविध प्रकारच्या मोफत वैद्यकीय उपचार व चिकित्सा शिबिराचे आयोजन. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वैद्यकीय तज्ञांचा शिबिरात सहभाग. आजवर हृदयरोग तपासणी शिबिर, दंतरोग चिकित्सा, त्वचारोग, पोटाचे विकार व गॅस्ट्रोस्कोपी शिबिरे, मूत्ररोग शिबिर, नेत्र तपासणी शिबीर ,मधुमेह सल्ला व उपचार अशा विविध प्रकारच्या मोफत शिबिराचे आयोजन.
रक्तदान हेच श्रेष्ठदान या अंतर्गत गेली दहा वर्ष दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन. “कळी उमलताना” या प्रकल्पांतर्गत इयत्ता 8 वी ते 10 वीत शिकणाऱ्या मुलींसाठी स्त्री-आरोग्य ,शरीर रचना ,लैंगिक शिक्षण , याबद्दलचे मार्गदर्शन शिबिरे. अमेरिका व भारत सरकार (KLE Hospital)यांच्या संयुक्त योजने मार्फत ५ वर्षासाठी घेतलेला ‘First Breath'(पहिला श्वास) व Use of Low dose Aspirin in pregnancy प्रकल्प अंतर्गत ‘सुरक्षित प्रसूती व सुरक्षित बालक’,सुलभ प्रसूती प्रशिक्षण योजनेतील सहभागाबद्दल संस्थेमार्फत प्रशस्तीपत्र. भ्रष्टाचार निर्मूलन समिती निपाणी मार्फत अण्णा हजारे यांच्या हस्ते ‘समाज भूषण’ पुरस्काराने सन्मानित. ग्लोबल सोसायटी फॉर हेल्थ न्यू दिल्ली संस्थेमार्फत बेळगाव विभागातून ‘चिकित्सकरत्न अवार्ड ‘ने सन्मानित.
डॉ .डी .वाय .पाटील यांच्या हस्ते वैद्यकीय सेवा व समाजसेवेबद्दल श्री क्षेत्र पंतबाळेकुंद्री (बेळगाव) येथे सन्मान. नॅब लायन्स क्लब मिरज व विवेकानंद नेत्रालय कुपवाड यांच्या संयुक्त विद्यमाने निपाणी भागातील अत्यंत गरीब अशा १२०० पेक्षा अधिक रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून दिल्याबद्दल “विशेष गौरव पुरस्कार व सन्मानपत्र”.
आमदार जोल्ले यांच्या हस्ते निपाणी भागात दर वर्षी होणाऱ्या कृषी महोत्सवातील २०१५ सालचा ‘विशेष वैद्यकीय सेवा पुरस्कार’. बेळगावच्या श्री पंत महाराज बाळेकुंद्री संस्थान येथील ना नफा ना तोटा या तत्वावर ‘धर्मार्थ दवाखाना ‘ कार्यवाहक म्हणून कार्यरत. श्री पंत महाराज आदर्श विद्यामंदिर मराठी व कन्नड पहिली ते दहावी विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजनेतून मोफत शिक्षणाची सोय. श्री दत्त संस्थान पंत बाळेकुंद्री संस्थेचे स्थायी कमिटी सदस्य म्हणून कोल्हापूर, सांगली, मिरज, बेळगाव, गोवा, गडहिंग्लज, गारगोटी, कापशी विभागाची विशेष जबाबदारी. या सर्वाबरोबर विविध प्रकारच्या ज्ञानवर्धक मेडिकल पोस्ट करून विविध डॉक्टर ग्रुपना वैद्यकीय ज्ञान देण्याचे उल्लेखनीय कार्य.