धारवाड जिल्ह्याचे विभाजन करून तीन जिल्ह्यांची निर्मिती केली आहे .त्याप्रमाणे बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करून एकूण तीन जिल्ह्यांची निर्मिती करणे शक्य आहे असे वक्तव्य विधान परिषद सदस्य महानतेश कवटगीमठ यांनी चिकोडी येथे पत्रकारांशी बोलताना केले.
प्रशासनाच्या दृष्टीने बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करावे अशी जनतेची मागणी आहे.त्यामुळे बेळगाव जिल्ह्याचे तीन जिल्ह्यात विभाजन करणे आवश्यक आहे.मुख्यमंत्र्यांनी देखील या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
सध्या सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे विभाजन करणे ही संवेदनशील बाब आहे.तरीही आम्ही मुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांवर दबाव आणणार आहोत असेही कवटगीमठ म्हणाले.
![Mlc mahantesh k](https://belgaumlive.com/wp-content/uploads/2020/02/FB_IMG_1582535468100.jpg)
बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करून गोकाक चिकोडी आणि बेळगाव असे तीन जिल्हे निर्माण करण्यासाठी गोकाक आणि चिकोडीतील राजकीय नेत्यांनी दबाव वाढवला आहे.दरम्यान हे विभाजन केल्यास बेळगाव आणि खानापूर मधील मराठी भाषकांची संख्या अधिक होऊन मराठ्यांचे प्राबल्य वाढू शकते सीमा प्रश्नी सुप्रीम कोर्टात कर्नाटकची बाजू कमकुवत पडू शकते त्यामुळे जिल्ह्याचे अध्याप विभाजन झालेले नाही मात्र शासकीय कामा नुसार हे विभाजन करा अशी मागणी वाढू लागली आहे.