अंजनीनगर येथील दयानंद (दर्शन) किरण हावळ याने इंडियन ओरीजनल मार्शल आर्ट्स अँड सुपर कराटे ऑर्गनायझेशन इंडियातर्फे आयोजित परीक्षा उत्तीर्ण होऊन “ब्लॅक बेल्ट मास्टर्स सर्टिफिकेट” प्राप्त केले आहे.
इंडियन ओरीजनल मार्शल आर्ट्स अँड सुपर कराटे ऑर्गनायझेशन इंडियातर्फे घेण्यात आलेली परीक्षा उत्तीर्ण होऊन ब्लॅक बेल्ट मास्टर्स सर्टिफिकेट मिळण्याबरोबरच दयानंद हावळ याने ब्लॅक बेल्ट प्रो वरून ब्लॅक बेल्ट काॅन हा दर्जा संपादन केला आहे. रामतीर्थनगर येथील उदय इंग्रजी माध्यमिक शाळेत इयत्ता 10 वी मध्ये शिकणारा दयानंद हा वर्ड काॅम्बॅट डू मार्शल आर्ट्स सुपर कराटे संस्थेचा विद्यार्थी आहे. त्याला कराटे प्रशिक्षक महेंद्र महिंद्रकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
कराटेमध्ये यापूर्वी दयानंद हावळ याने मिळवलेल्या यशापैकी काही उल्लेखनीय यश पुढीलप्रमाणे – राज्यस्तरीय स्पर्धा : कित्तूर येथे कटा प्रकारात सुवर्णपदक. सांगली येथे कटा प्रकारात कांस्य आणि फाईट प्रकारात रौप्यपदक.
राष्ट्रीय स्पर्धा : पुणे येथे कटा प्रकारात रौप्य आणि फाईट प्रकारात सुवर्णपदक, मुंबई येथे कट्टा प्रकारात सुवर्ण आणि फाईट प्रकारात रौप्यपदक, चंदगड येथे कट्टा प्रकारात सुवर्ण आणि फाईट प्रकारात सुवर्ण. आंतरराष्ट्रीय स्पर्धा : गोव्यामध्ये कटा प्रकारात सुवर्ण आणि फाईट प्रकारात कांस्यपदक. याव्यतिरिक्त बेळगाव परिसरातील विविध कार्यक्रमांमध्ये दयानंद कराटेची प्रात्यक्षिके सादर करीत असतो. ब्लॅक बेल्ट मास्टर्स सर्टिफिकेट मिळाल्याबद्दल सध्या दयानंद हावळ याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.