सिलेंडर स्फोट झाल्याने घराला लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान झाले आहे. रविवारी दुपारी बेळगाव तालुक्यातील गजपती इथे ही घटना घडली आहे.
मारुती सिद्राय करडी असे घराला आग लागलेल्या मालकांचे नाव असून यात लाखोंचे नुकसान झाले आहे.घरात सिलेंडर ब्लास्ट झाला त्यावेळी कुणीही नव्हते त्यामुळं सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घरातील कपडे धान्य भांडी असे सामान आगीत जळून खाक झाली आहेत.आग लागताच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले मात्र आगीत घरातील सामान व घर जुळून खाक झाले होते.बागेवाडी पोलिसांत फिर्याद दाखल झाली आहे.