Saturday, December 28, 2024

/

मृत्युपंथाला लागलेल्या गोमातेला जीवदान

 belgaum

बस अंगावरून गेल्याने पोट फाटून गंभीर जखमी झालेल्या एका मोकाट गाईवर पशुवैद्यांकरवी जागेवरच तातडीची शस्त्रक्रिया करून श्रीराम सेनेच्या  बजरंग दल या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्या गोमातेला मृत्युच्या दाढेतून बाहेर काढल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. हिंडलगा रोडवरील महात्मा गांधीजी सर्कलनजीक ही घटना घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, हिंडलगा रोडवरील महात्मा गांधीजी सर्कल नजीक गुरुवारी सायंकाळी 7.30 च्या सुमारास भरधाव बसने रस्ता रस्त्यावर फिरणाऱ्या एका मोकाट गाईला जोराची धडक दिली. सदर धडकेमुळे संबंधित काय थेट बसच्या चाकाखाली आली आणि तिच्या पोटावरुन गेले. परिणामी गाईचे पोट विदीर्ण होऊन आतडी बाहेर आली. रक्ताच्या थारोळ्यात तडपडत पडलेली संबंधित गाय पाहून स्त्यावरून ये-जा करणार्‍या पैकी एकाने श्रीराम सेना गोरक्षा अध्यक्ष बलवंत शिंदोळकर यांना या घटनेची माहिती दिली. सदर माहिती मिळताच शिंदोळकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह त्वरित घटनास्थळी धाव घेतली. यावेळी आपल्यासोबत त्यांनी एका पशुवैद्यला देखील घेतले होते.

Gorakshak
Gorakshak

ही सर्व मंडळी घटनास्थळी पोहोचताच पोटातील आतडी बाहेर आलेल्या गाईची गंभीर अवस्था पाहून पशुवैद्यांनी रस्त्यावरच गाईवर तातडीची शस्त्रक्रिया केली. रक्ताच्या थारोळ्यातच जवळपास 3 तास चाललेल्या या जोखमीच्या शस्त्रक्रियेनंतर गाईच्या पोटाला टाके घालून तिला एका वाहनातून सुखरूप गो शाळेकडे धाडण्यात आले. काल गुरुवारी सायंकाळी अपघात झालेल्या ठिकाणचे पथदीप ही बंद होते. त्यामुळे रात्रीच्या अंधारात बॅटऱ्या आदींच्या उजेडामध्ये गायीवर शस्त्रक्रिया करण्यात आली हे विशेष होय. हा सर्व प्रकार होईपर्यंत रात्रीचे 10.30 वाजले होते.

बस गाईच्या अंगावरुन गेल्यानंतर श्रीराम सेना गोरक्षा कार्यकर्ते त्वरित वेळेवर घटनास्थळी पोहोचल्यामुळेच संबंधित गाईला जीवदान मिळू शकले. याबद्दल सदर रस्त्यावरून ये-जा करणार्‍या नागरिकांमध्ये प्रशंसोद्गार काढले जात होते.

मृत्युपंथाला लागलेल्या गायीला जीवदान देणाऱ्यांमध्ये पशुवैद्य्यांसह बजरंग दलाचे कार्यकर्ते राहूल केसरकर पप्पू जाधव नरेश शिंदे.विजु कृष्णकांत गौंडाडकर सागर जाधव चित्रु जाधव शहर श्रीराम सेना गोरक्षा अध्यक्ष बलवंत शिंदोळकर, शंकर पाटील, नरू नीलजकर, रोहित मुरकुटे, शुभम सुतार, युवराज चव्हाण, प्रवीण देवगेकर, महेश सातेरीकर, पप्पू तरळे आधी कोनवाळ गल्ली, गणपत गल्ली, बापट गल्ली परिसरातील श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. गोमातेला वाचवण्याचे कार्य केल्याबद्दल या सर्वांना धन्यवाद दिले जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.