एका विवाहित तरूणाने पेट्रोल ओतून भररस्त्यात पेटवून दिल्याने मृत्यूमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील 25 वर्षीय शिक्षिकेला श्रद्धांजली वाहताना रोटरी क्लब जीएसएसतर्फे विद्यार्थीसाठी आयोजित आत्मसंरक्षण कार्यशाळा सोमवारी यशस्वीरित्या पार पडली.
महाराष्ट्रातील हिंगणघाट येथे भररस्त्यात पेटवून दिल्याने उपचाराचा फायदा न होता मृत्युमुखी पडलेल्या शिक्षिकेला जर आत्मसंरक्षणाची कला अवगत असती तर ती कदाचित वाचली असती आणि तिने हल्लेखोराला पकडूनही दिले असते. हे लक्षात घेऊन रोटरी क्लब ऑफ जीएसएसतर्फे कराटे मास्टर जितेंद्र बी काकतीकर आणि वरिष्ठ कराटे प्रशिक्षक साहिर शेख यांनी. सोमवारी गोविंदराम सक्सेरिया (जीएसएस) कॉलेजमध्ये आत्मसंरक्षण कलेच्या कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेस कॉलेजमधील 86 विद्यार्थिनी हजर होत्या.
याप्रसंगी आत्मसंरक्षणाचे महत्त्व विशद करताना मुलींना आत्मसंरक्षणाचे ची कला अवगत असणे ही काळाची गरज असल्याचे जीतेंद्र काकतीकर यांनी स्पष्ट केले त्याप्रमाणे त्यांनी आत्म संरक्षणाची प्रात्यक्षिके सादर करून विद्यार्थिनींना त्याचे धडे दिले सदर कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरल्याचे सांगून विद्यार्थिनी आत्म संरक्षणाच्या कलेत प्रवीण होण्यासाठी ठी वरचेवर अशा कार्यशाळेचे आयोजन केले जावे हे अशी मागणी केली.
सदर कार्यशाळेचे उद्घाटन जीएसएस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नागराज डी. हेगडे यांच्या हस्ते झाले. प्रारंभी प्रा. डॉ. प्रमोदा हनमगोंड यांनी सर्वांचे स्वागत केले. विद्यार्थिनी ऋतुजा खुरपे येणे प्रशिक्षकांचा परिचय करून दिला, शेवटी ऐश्वर्या अणवेकर हिने सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटरी क्लब ऑफ जीएसएसचा अध्यक्ष ओंकार पेडणेकर यांने केले.