महानगरपालिकेच्या आरोग्य निरीक्षक अनिल बोरगावी यांनी बाजारपेठेतील रस्ते स्वच्छ राहावेत म्हणून अनोखी उपाययोजना राबवली आहे.
वडगाव मध्ये भाजी विक्रेत्या समोर रांगोळी काढून कचरा टाकण्यासाठी डस्टबिन ठेवली आहे.त्याभोवती आकर्षक रांगोळी काढण्यात आली आहे.
त्यामुळे भाजी विक्रेत्या जवळील आणि भाजी खरेदी करण्यासाठी येणारी जनता कचरा डस्टबिनमध्ये टाकत आहे.त्यामुळे रस्ते स्वच्छ दिसत आहेत.आरोग्य निरीक्षक अनिल बोरगावे यांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे.
बेळगाव शहराचा स्वच्छ भारत असोत स्मार्ट सिटीअसो रँकिंग असो बेळगावची यात सतत घसरण झाली आहे कचऱ्याची समस्या तर सगळीकडे भेडसावत आहे असे असताना रस्ते स्वच्छ करण्याची आरोग्य निरीक्षकांचा उपक्रम कौतुकास्पद आहे.