रुक्मिणी नगर येथील डुकरांचा बंदोबस्त करा अशा मागणीचे निवेदन रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आणि समता सैनिक दल यांच्यातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
रुक्मिणी नगर येथे सहारा सुलेमानबेग जमादार या दोन वर्षांच्या मुलीवर डुकरांनी हल्ला केल्यामुळे ती जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सहारा ही मुलगी आपल्या घराजवळ खेळत असतांना तिच्यावर डुकराने हल्ला करून तिच्या डोक्याला,कानाला चावा घेऊन तिला जखमी केले आहे.
तिला लगेच उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.नंतर तिला पुढील उपचारासाठी के एल इ हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.यापूर्वीही रुक्मिणी नगर येथे डुकरांनी हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत.त्याबद्दल तक्रारीही करण्यात आल्या आहेत.पण अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.