गेल्या वर्षीच्या गणेश उत्सवात शांततेत मोलाची कामगिरी बजावणाऱ्या चव्हाट गल्ली येथील सार्वजनिक गणेश मंडळाला बेळगाव पोलिसांनी 2019चा गणराया पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.पोलीस क्रीडा स्पर्धा बक्षीस वितरण समारंभावेळो पोलीस आयुक्त बी एस लोकेशकुमार यांनी चव्हाट गल्ली गणेश मंडळाला या पुरस्काराने सन्मानित केले .
या वर्षीच्या गणेश उत्सवात चव्हाट गल्ली गणेश मंडळाने अत्यंत सामंजस्य पणाची भूमिका घेत सर्व मंडळा समोर आदर्श ठेवला होता गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी न लावता मिरवणूक काढली होती आणि गणेश मूर्तींची उंची 16 फुटा वरून 10 फुटांवर कमी केली आहे या शिवाय शहराच्या शांततेत योगदान दिले होते. गल्लीचे पंच महादेवराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली विधायक उपक्रम घेतले होते याची दखल पोलिसांनीही घेतली आहे.
चव्हाट गल्ली गणेश मंडळाने मूर्तीची उंची कमी करत विधायकता जपल्याने बेळगाव Live ने देखील या मंडळाचा सत्कार केला होता.पोलिसांच्या बक्षीस समारंभास सुनिल जाधव, रोहन जाधव,उत्तम नाकडी,प्रताप मोहिते,अमर येळ्ळूरकर,विशाल मुचंडी संजय रेडेकर, अनंत बामणे,संदीप कामुले,नागेश धामणेकर, विनायक गौडाडकर आदींनी हजेरी लावत पुरस्कार स्वीकार केला.
मागील वर्षी गणेश उत्सवात बेळगाव live ने देखील या मंडळाची दखल घेतली होती.