तिकीट काढण्यावरून आणि चिल्लर रक्कमेवरून सी बी टी बस मध्ये वादावादीचा प्रकार घडला होता या मारामारीचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला होता काकती पोलिसांनी या मारामारी प्रकरणी दोघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अज्जप्पा कागणीकर वय 40 व त्यांचे मोठे बंधू गंगाराम कल्लाप्पा कागणीकर वय 45 दोघेही रा.कडोली अशी त्यांची नाव आहे.
काकती पोलीस निरीक्षक श्रीशैल कौजलगी यांनी दोघांना अटक करत ही कारवाई केली आहे.पोलिसांनी जरी या दोघांवर कारवाई केली असली तरी व्हायरल झालेल्या त्या व्हीडिओत बस कंडक्टरनेच प्रवाश्यांना मारहाण केल्याचे दृश्य दिसते.
31 जानेवारी रोजी कडोली जवळ बस मध्ये ही घटना घडली होती सी बी टी बस मधून दोन प्रवाशी आणि बस कंडक्टर यांच्यात बाचाबाची होऊन सदर प्रकरण हातघाईवर गेले होते.बस कंडक्टर रुद्रगौडा होसमनी वय 43 यांनी या संबंधी काकती पोलीस स्थानकात तक्रार दिली होती त्या नुसार पोलिसांनी दोघा जणांना अटक केली आहे.
तो व्हायरल झालेला व्हीडिओ पहाण्यासाठी खालील लिंक क्लिक करा-बेळगाव live ने व्हायरल झालेल्या त्याच दिवशी सदर व्हीडिओ share केला होता
बेळगाव केदनूर बस मध्ये कंडक्टरच प्रवाशाच्या कानशिलात लगावतो तेंव्हा…….
तिकिटावरून वाद झाल्याने शुक्रवारी सायंकाळी चार वाजता ही घटना घडली आहे pic.twitter.com/dYcrHGpmA6— Belgaumlive (@belgaumlive) January 31, 2020