कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर गेल्या असून विध्यमान सदस्यांना सहा महिने मुदतवाढ मिळाली आहे.
बेळगाव बेळगाव छावणी सीमा परिषदेच्या विद्यमान सदस्यांची मुदत या फेब्रुवारी महिन्यात संपत असताना सर्वांचे लक्ष निवडणूकीची घोषणा कधी होणार याकडे लागले होते मात्र या लोकनियुक्त सदस्यांना पुन्हा मुदतवाढ मिळणार आहे.
देशातील 55 कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या लोकनियुक्त सदस्यांची मुदत फेब्रुवारी महिन्यात संपणार आहे संरक्षण खात्याने निवडणुकीची तयारी करण्याच्या सूचना देखील सर्व कॅटोंमेंट बोर्डाना दिल्या होत्या. बेळगाव कँटोन्मेंट बोर्डाने महिलांसाठी व मागासवर्गीयांसाठी प्रभाग देखील राखीव केले होते केवळ निवडणुकीच्या घोषणेच्या तारखेकडे लक्ष लागले होते मात्र संरक्षण खात्याने सध्या घेणे निवडणूक घेण्यास नकारात्मक भूमिका दर्शविली असून निवडणुका पुन्हा सहा महिने पुढे ढकलल्या आहेत
संरक्षण खात्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील पंचावन्न कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुका आगामी सप्टेंबर महिन्यात घेण्याचा विचार आहे त्यामुळे बेळगाव कॅंटोन्मेंट बोर्डाच्या सदस्यांना देखील आणखी सहा महिने मुदतवाढ मिळाली आहे. गेल्या पाच वर्षात अनेक कॅटोंमेंट बोर्डाच्या अनेक वार्डा मध्ये विकास कामे राबवण्याची संधी या सदस्यांना मिळाली आहे.