कॅपिटल वन सोसायटी आयोजित मराठी एकांकिका स्पर्धा – 2020 या स्पर्धेच्या खुल्या गटाचे विजेतेपद रंग यात्रा नाट्यसंस्था इचलकरंजीच्या ‘मोठा पाऊस आला आणि’ या एकांकिकेने हस्तगत केले. त्याचप्रमाणे आंतरराज्य शालेय गट आणि बेळगाव जिल्हा शालेय गटात अनुक्रमे शिंदे अकॅडमी कोल्हापूरची ‘आदिबांच्या बेटावर’ व कॉमन टच प्रोडक्शन बेळगावची ‘ईश्वरा’ ही एकांकिका प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली.
कॅपिटल वन आयोजित मराठी एकांकिका स्पर्धेचा दशकपूर्ती सोहळा यंदा पार पडला. कॅपिटलवन तर्फे गेल्या गुरुवार ते रविवार या कालावधीत मराठी एकांकिका 2020 चे यशस्वी आयोजन करण्यात आले. विविध तीन गटात घेण्यात आलेल्या या एकांकिका स्पर्धेचा अंतिम निकाल खालील प्रमाणे आहे.
खुला गट : रंग यात्रा नाट्यसंस्था इचलकरंजी (एकांकिका – मोठा पाऊस आला आणि). 2) गायन समाज देवल क्लब कोल्हापूर (एकांकिका – इट हॅपेन्स), 3) सस्नेह सांगली (एकांकिका – साठा उत्तराची कहाणी). आंतरराज्य शालेय गट : 1) शिंदे अकॅडमी कोल्हापूर (एकांकिका – आदिबांच्या बेटावर), 2) सविनय हौशी नाट्य संस्था कोल्हापूर (एकांकिका – झेप), 3) सिटी हायस्कूल सांगली (एकांकिका – घुसमट). बेळगाव जिल्हा शालेय गट : 1) कॉमन टच प्रोडक्शन बेळगाव (एकांकिका – ईश्वरा), 2) रंगभूमी ग्रुप बेळगाव (एकांकिका – थेंबाचे टपाल), 3) मराठी विद्या निकेतन बेळगाव (एकांकिका – म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे).
या मराठी एकांकिका स्पर्धेअंतर्गत उत्कृष्ट पुरुष अभिनय, उत्कृष्ट स्त्री अभिनय, उत्कृष्ट दिग्दर्शन, उत्कृष्ट नेपथ्य, उत्कृष्ट रंगभूषा – वेशभूषा आणि उत्कृष्ट प्रकाशयोजना ही पारितोषिके देखील प्रदान करण्यात आली. सदर एकांकिका स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रविवारी कॅपिटल वन सोसायटीचे चेअरमन शिवाजी हंडे यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पाहुणे अविनाश पोतदार यांच्या हस्ते पार पडला.