बेळगाव बार असोसिएशनतर्फे ‘नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019’ या विषयावर शनिवार दि. 15 फेब्रुवारी 2020 रोजी दुपारी 1.45 वाजता चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
न्यायालय आवारातील ॲडव्होकेट समुदाय भवन येथे हा कार्यक्रम होणार आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 प्रमाणे आता 1955 सालच्या नागरिकत्व कायद्यात दुरूस्ती करण्यात येणार आहे. यासंदर्भात प्रसारमाध्यमांद्वारे जनतेला सर्वांगाने माहिती मिळावी, या उद्देशाने सदर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रात ‘नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019’ बाबत चर्चा आणि वादविवाद होणार आहे. तेंव्हा सदर चर्चासत्रामध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी गुरुवार दि. 13 फेब्रुवारीपूर्वी आपली नांवे आयोजकांकडे नोंदवावयाची आहेत. तसेच कोणत्याही जाती, धर्म, पंथाचा संदर्भ न घेता आपले विचार कायद्याच्या चौकटीत मांडावयाचे आहेत.
वक्त्यांना त्यांचे मत मांडण्यास कितीवेळ द्यावयाचा हे कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या वक्त्यांच्या संख्येवरून शुक्रवार दि. 14 फेब्रुवारी रोजी निश्चित केले जाणार आहे. नागरिकांनी या कार्यक्रमाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. ए. जी. मुळवाडमठ यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.