लवकरच होऊ घातलेल्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारात बेळगाव जिल्ह्यातील रमेश जारकीहोळी, उमेश कत्ती आणि श्रीमंत पाटील या तिघांना मंत्रिमंडळात स्थान निश्चित मानले जात असताना कुणाला कोणते खाते मिळणार यावर देखील आतापासूनचं चर्चा सुरू झाली आहे.
उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना परिवाहन तर शशिकल जोलले यांना महिला बाल कल्याण खात मिळालं आहे ते बेळगाव जिल्ह्यातील मंत्री आहेत वरील तिघांची मंत्री पदी वर्णी शक्य असून यात उमेश कत्ती यांच्या गळ्यात कृषी मंत्री पद तर अपेक्षेप्रमाणे रमेश जारकीहोळी यांना जलसंपदा आणि कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील यांना बागायत खाते मिळेल अशी दाट शक्यता आहे.
उमेश कत्ती यांनी मागील भाजप सरकारच्या कार्यकाळात कृषी मंत्री पद चांगल्या पद्धतीने हाताळले होते राज्याच्या स्पेशल कृषी बजेट मांडला होता त्यामुळे त्यांना कृषी तर रमेश जारकीहोळी यांनी सुरुवाती पासूनच जलसंपदा खात्याची अट घातली होती त्यानुसार त्यांना जलसंपदा खाते तर कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील यांना बागायत खाते (राज्य मंत्री पद) मिळण्याची शक्यता असे भाजप सूत्रांकडून समजले आहे. बुधवारी रात्री याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
एकूणच सवदी जोलले आणि होणारे तिघे असे पाच मंत्री बेळगाव जिल्ह्याला मिळणार असून यातील एक राज्य मंत्रीतर चार कॅबिनेट दर्जाचे मंत्री असू शकतात.मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव शंकर गौडा पाटील हे देखील राज्य मंत्री पदाचा दर्जा असलेलं पद बेळगाव जिल्ह्याकडे आहेच .मंत्र्यांची संख्या वाढली तरी बेळगावतील लोकांच्या समस्या कधी कमी होतील याकडे लक्ष लागले आहे.
Five ministers very nice Belgaum Dist. Thanks to Hon.ble Yediyurappa CM