गेली दोन-तीन वर्षे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास सह समाजोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या शहापूर पोलीस स्थानकाला यंदाचा ‘सर्वोत्कृष्ट पोलीस स्थानक’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
शहरातील पोलिस मैदानावर नुकत्याच पार पडलेल्या पोलीस क्रीडा महोत्सवाच्या बक्षीस समारंभाप्रसंगी पोलीस आयुक्त बी.एस. लोकेशकुमार यांनी ‘सर्वोत्कृष्ट पोलीस स्थानक’ पुरस्कार जाहीर करून तो शहापूर पोलीस स्थानकाला प्रदान केला.सध्याचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार यांनी तो पुरस्कार स्वीकारला.
गेल्या या 2017 सालापासून शहापूर पोलीस स्थानक उत्कृष्टरित्या कायदा व सुव्यवस्था परिस्थिती हाताळत आहे. विशेष म्हणजे 2017 18 या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये तर 153 अ कायद्यान्वये भाषिक तेढ निर्माण करण्याचा एकही गुन्हा शहापूर पोलीस स्थानकात नोंदविला गेलेला नाही. याची दखल खुद्द तत्कालीन गृहमंत्री रामलिंग रेड्डी यांनी घेऊन शहापूर पोलीस स्थानकात बद्दल प्रशंसोद्गार काढले होते. त्याचप्रमाणे गृहमंत्री रेड्डी यांनी पोलिस स्थानकाला भेट देऊन तत्कालीन पोलिस निरीक्षक जावेद मुशाफिरी यांचे विशेष कौतुक केले होते.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची मुख्य जबाबदारी पार पाडण्यात बरोबरच शहापूर पोलीस स्थानकाकडून सातत्याने सामाजिक कार्य देखील केले जाते. आपल्या कार्यक्षेत्रातील हुशार विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचा पायंडा शहापूर पोलिस थानकाने पाडला आहे. यासाठीच गेल्या 2 – 3 वर्षांतील शहापूर पोलीस स्थानकाच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन पोलीस आयुक्त बी.एस. लोकेश कुमार यांनी या पोलीस स्थानकाला सर्वोत्कृष्ट पोलीस स्थानक पुरस्कार जाहीर करून तो प्रदान हे देखील केला.