विविध शासकीय योजनांचा लाभ अनुसूचित जाती-जमातीच्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बेळगाव तालुक्यातील अल्पसंख्यांक समिती व इतर संघटनांची बैठक घेण्यात आली. तहसीलदार कार्यालयात ही बैठक झाली. यावेळी अल्पसंख्यांकांना योजनांचा लाभ द्यावा अशी सूचना तालुका पंचायतचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी यांनी केले आहे.
अनेक वर्षांपासून अनुसूचित जाती-जमातीच्या नागरिकांना योजनांची माहिती देण्यात येत नाही. त्यामुळे अनेक जण योजनांपासून वंचित राहिले आहेत. मात्र यापुढे तसे न होता प्रत्येक अनुसूचित जाती-जमातीच्या नागरिकांना योजनांचा लाभ करून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे कलादगी यांनी सुचविले आहे.
तालुक्यातील अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांना अजूनही सरकारी योजना बाबत कोणतीच माहिती नसल्याने अनेक जण बेरोजगार फिरत आहेत. त्यामुळे त्यांना उद्योगधंदे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. तालुक्यात सध्या अशी परिस्थिती निर्माण झाली असली तरी यापुढे ती कसे दूर करता येईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
तालुक्यातील अनुसूचित जाती जमातीच्या लोकांनी योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. त्यासाठी कोणतेही सहकार्य लागल्यास मला हाक मारा मी सामोरा येईन. त्याचबरोबर कोणत्याही अधिकाऱ्याने योजनांची माहिती देण्यास टाळाटाळ केली तर थेट संपर्क साधून याची माहिती मला द्यावी असे आव्हानही तालुका पंचायत चे मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लीकर्जून यांनी केले आहे. यावेळी तहसीलदार व विविध दलित संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.